इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक

  लॉकडाऊनच्या  विरोधात व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक



बीड, प्रतिनिधी....

    बीड जिल्ह्यात दि. 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.परंतु केलेले लॉकडाऊन चे आदेश मागे न घेतल्यास व्यापारी संघटना निषेध म्हणून संपुर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी व लॉकडाऊन मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. परंतु लॉकडाऊन करत असतांना  बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही की, व्यापारी या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडणार आहेत. त्यांचा विचार न करता  सरळ लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक व्यापारी या गोष्टीमुळे परेशान होणार तर आहेच परंतु आर्थिक अडचणीत देखील सापडणार आहेेत.

जिल्हा प्रशासन वेळीवेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बोलवून बैठक घेते व नागरिकांसाठी गैरसोय होणार नाही यावर चर्चा करते परंतु यावेळेस  व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे आदेश काढले ते जाचक व अन्यायकारक आहेत.आदेशात काही  व्यापार्‍यांना व्यवसाय करण्याची अवधी सकाळी 7 ते 9 या वेळेत दिलेली आहे. दिलेली वेळ व्यापारी व ग्राहकांसाठी सोयीची किंवा योग्य आहे का ? आदेश काढतांना कमीत कमी सामान्य नागरिकांचा तरी विचार करावयास पाहिजे होता परंतु या गोष्टीकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष करुन प्रशासनाने लॉकडाऊन करुन आपली जबाबदारी व्यापारी व नागरिकांवर सोपवून  बिनधास्त झालोत ही मानसिकता याच्यातुन प्रकर्षाने दिसते. एका निवेदनाव्दारे   सर्वश्री. संतोष सोहनी , कार्याध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, विनोद पिंगळे, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, मनमोहन कलंत्री, अशोक शेटे, जवाहरलाल कांकरीया, भास्कर गायकवाड, प्रकाश कानगांवकर, विनोद ललवाणी, भास्कर जाधव, राजेंद्र मुनोत, दिपक कर्नावट, मंगेश लोळगे, सुर्यकांत महाजन, जितेंद्र पढदरीया, किशोर शर्मा, सखाराम शेळके, पारस लुनावत, प्रमोद निनाळ, वर्धमान खिंवसरा, मदनलाल अग्रवाल, जितेंद्र लोढा, गोटु संचेती, लईक अहेमद, हरीओम धुप्पड, अनिल गुप्ता, महेश शेटे, राजेंद्र तापडीया, तसेच माजलगाव येथील अध्यक्ष - सुरेंद्र रेदासणी, सुनील भांडेकर, संजय सोळंके, धनराज बंब, अनंत रुद्रवार, संतोष अब्बड, कपिल पगारीया, मेहता, गणेश लोहीया, परळी येथील अध्यक्ष - माऊली फड, नंदुसेठ बियाणी, संदिप लाहोटी, रिकबचंद कांकरीया, सुरेश आगवान, बबलु कच्ची, रमाकांत निर्मळ, पवार, विष्णु देवशेटवार, गेवराई येथील प्रताप खरात, संजय बरगे, अंबाजोगाई येथील ईश्वरप्रसाद लोहीया, दत्तप्रसाद लोहीया, भारत रुद्रवार, श्रीनिवास हराळे, सुभाष बडेरा, रिकबचंद सोळंकी, पाटोदा येथील अजित कांकरीया, बाळू जाधव, सुभाष कांकरीया, कलीमभाई, केज येथील - महादेव सुर्यंवशी, धारुर - अशोक जाधव, वडवणी - विनायक मुळे, आष्टी - संजय मेहेर, शिरुर - प्रकाश देसर्डा व  संपूर्ण बीड जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!