परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!*

 *सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "सेवाधर्म" हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले.

       राष्ट्रवादी वकील संघ व सेवाधर्म टीमच्या वतीने परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले. यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पी एम सातभाई यांच्या हस्ते "जलनेती पात्र" वकील बांधवाना भेट देण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास अॅड. डी पी कडभाने,अॅड.डी एल उजगरे,राष्ट्रवादी वकील संघाचे शहर अध्यक्ष adv मनजीत सुगरे,अॅड. गिराम ,अॅड.बाळासाहेब मुंडे, अॅड. दस्तगिर,अॅड. एजाज , अॅड. उरुज आदी वकील बांधव उपस्थित होते.

                "जल' म्हणजे "पाणी" आणि "नेती" म्हणजे 'स्वच्छता".प्राचीन काळापासून योगसाधना करण्यापूर्वी जलनेती करण्याची शास्त्रोक्त पद्धती आहे.आजच्या काळात या पद्धतीचा अवलंब केल्याने अनेकांना याचे फायदे झालेले आपण सर्वांनी प्रसारमाध्यमातून बघितले आहे.कोरोनाचा विषाणू श्वसन मार्गाने प्रवेश करतो आणि सर्वप्रथम आपला संचय हा नाकपुड्या मागील खाचात करतो. आयटीपीसीआर चाचणी मध्ये याच खाचेतून सॅम्पल घेतले जाते.आपल्याला या जलनेतीद्वारा नाकपुड्याद्वारे याच खाचा स्वच्छ ठेवता येतात,कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही केवळ यासाठी स्वच्छ पाणी घेतले पाहिजे. सर्वांना उपयुक्त ठरणारे जलनेती पात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वितरीत करण्यात येत आहेत.याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरीकांना होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!