MB NEWS-कोविशील्ड घेतलेल्याना 82 ते 85 दिवसानंतर तर को वॅक्सिंन घेतलेल्याना 35 दिवसानंतर लस मिळणार

 'ज्याचा आहे वशिला-त्याने जावे लसीला' असे म्हणायची गरज नाही...आता घरबसल्या नोंदणी करा व मेसेज आला की लस घेण्यासाठी जा !



कोविशील्ड घेतलेल्याना 82 ते 85 दिवसानंतर तर को वॅक्सिंन घेतलेल्याना 35 दिवसानंतर लस मिळणार


बीड – ज्या 45 वर्षावरील नागरिकांनी कोविशील्ड किंवा को वॅक्सिंन लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोस साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे .कोविशील्ड घेतलेल्याना 82 ते 85 दिवसानंतर तर को वॅक्सिंन घेतलेल्याना 35 दिवसानंतर लस मिळेल .

    तसेच को वॅक्सिंन या लसीचा दुसऱ्या डोस चा कालावधी किमान 35 दिवस करण्यात आला आहे,त्यासाठी देखील रजिस्ट्रेशन आवश्यक आहे,नागरिकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करूनच लस बुक करावी ,तसेच 18 ते 44 साठी नव्याने सूचना जारी केल्या जातील .

        सुरवातीला दोन्ही लसीचा 28 दिवसानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना होत्या,नंतर कोविशील्ड साठी 45 दिवसांची मुदत वाढवली गेली .आता पुन्हा त्यात बदल करून 82 ते 85 दिवसांची मुदत केली आहे .ज्यांनी कोविशील्ड चा पहिला डोस घेतला आहे .त्यांनी आता http://ezee.live/Beed_Covid19_Registration या लिंक वर जाऊन दुसऱ्या डोस साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे .हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर चार आकडी कोड येईल,तो कोड जपून ठेवावा,त्यानंतर 82 ते 85 दिवसानंतर आरोग्य विभागाकडून कॉल किंवा एसएमएस येईल तेव्हा लसीकरण केंद्रावर जाऊन कोविशील्ड लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकृष्ण पवार यांनी केले आहे .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार