MB NEWS- *परळीत उघडकीस आला असा श्रीमंत भिकारी.......!* _पिशवी चोरीची भिक्षुकाची पोलीसात तक्रार;तीन तासात तपास_(video news)

 *परळीत उघडकीस आला असा श्रीमंत भिकारी.......!*



_पिशवी चोरीची भिक्षुकाची पोलीसात तक्रार;तीन तासात तपास_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो. पण या भिकारी माणसाकडे काय असणार असे म्हणुन दुर्लक्ष केले जाते मात्र परळीत पिशवी चोरीच्या घटनेत तपासातुन खरोखरच श्रीमंत भिकारी उघडकीस आला आहे.वैद्यनाथ मंदिर समोर बसणार्या एका भिक्षुकाकडे तब्बल पावणेदोन लाख रुपये जमापुंजी असल्याचे दिसून आले.पोलीसांनी तीन तासात या पिशवी चोरीच्या घटनेचा तपास लावला आहे.

        रात्रंदिवस मेहनत केली तरी एवढी कमाई करू शकत नाहीत एवढी रक्कम एखाद्या भिक्षुकाकडे सापडली तर कोणालाही आश्चर्य वाटु शकते.भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो, पण या भिकारीच्या संपत्ती पुढे आपण भिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल. मुंबईतले  भिकारी आपल्या संपत्तीबद्दल  चर्चेत असतात. पण परळीतील भिकारी ही काही कमी नाहीत हे एका घटनेने आज पुढे आले आहे. 



        बाबूराव नाईकवाडे नावाची वयोवृद्ध व्यक्ती  वैद्यनाथ मंदिर समोर गेल्या अनेक वर्षांपासून बसून भीक मागते. या व्यक्ती ने पोलीस ठाण्यात येऊन आपली पिशवी हरवली असुन त्यात पावणेदोन लाख रुपये असल्याची तक्रार केली.अगोदर कोणाचाच विश्वास बसला नाही.परंतु नाईकवाडे यांनी आयुष्य भर जमा केलेली रक्कम हरवली असल्याची गयावया व रडारड केली.त्याची तगमग बघुन पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला.तीन तासात पोलीस तपासात ही हरवलेली पिशवी मिळवण्यात पोलीसांना यश आले. 



        पिशवी तपासणी केली असता 1 लाख 72 हजार 290 एवढी मोठी रक्कम त्या पिशवीत खरोखरच आढळून आली.पोलीसांनी नाईकवाडे यांना पंचासमक्ष ही रक्कम सुपुर्द केली.ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, डि.बी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, मधुकर निर्मळ (तात्या) आदींनी केली.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !