MB NEWS- *धोकादायक: परळीच्या रस्त्यावर वापरलेले पीपीई कीट आणि मास्क घालून फिरतोय वेडा* _पीपीई कीट आणि मास्क फेकले जातायत उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात_(video)

 *धोकादायक: परळीच्या रस्त्यावर वापरलेले पीपीई कीट आणि मास्क घालून फिरतोय वेडा* 

 _पीपीई कीट आणि मास्क फेकले जातायत उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य प्रचंड धोक्यात_


परळी वैजनाथ, प्रतिनिधी : वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पीपीई किट उघड्यावर फेकल्याने हे धोकादायक होऊ शकते. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यातच आज दि.२५ रोजी सायंकाळी ६ वा.सुमारास एका वेडसर व्यक्तीने शहरात धुमाकूळ घातला. वापरलेले पीपीई कीट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावर हा वेडा फिरत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे.

         परळीच्या कचरा संकलनात रस्त्यावर रस्त्याच्या कडेला रूग्णालयांत वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकल्या जात आहेत.वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा खच रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. पीपीई किटचा कचरा निचरा जिथल्या तिथे झाला पाहिजे परंतु हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब आहे.याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.जैविक कच-याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

         दरम्यान आज सायंकाळी तर धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे.वापरलेले पीपीई कीट आणि मास्क एका वेडसर व्यक्तीच्या हाती लागला हा इसम हे पीपीई कीट घालून परळीच्या रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरातून होणारे प्रयत्न लक्षात घेता हा प्रकार धक्कादायक आहे.दुर्देवाने असाच एखादा व्यक्ती 'सुपरस्प्रेडर' बनुन धोकादायक ठरू शकतो याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

                           ⬛ VIDEO ⬛




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार