परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-*"सेवा हाच ध्यास मनी.... तैसेची कर्म जीवनी" : डॉ. राजाराम मुंडेंचे कोरोना काळात जेष्ठ रुग्णांसाठी निरपेक्ष सेवाकार्य*(video)

 *"सेवा हाच ध्यास मनी.... तैसेची कर्म जीवनी" : डॉ. राजाराम मुंडेंचे कोरोना काळात जेष्ठ रुग्णांसाठी निरपेक्ष सेवाकार्य*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      ज्येष्ठ नागरिकांना अनेक कारणांमुळे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जाता येत नाही.  अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वांनाच घरपोच आरोग्य सेवा मिळेल हे शक्य नाही. परंतु परळीतील असा एक डाॅक्टर आहे जो जेवढे शक्य होईल तेवढे सेवाकार्य तेही निरपेक्षपणे करत आहे.कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत "सेवा हाच ध्यास मनी....तैसेची कर्म जीवनी" याचा प्रत्यय डॉ.राजाराम मुंडे करत असलेल्या सेवाकार्यातुन दिसुन येतो.



        सामाजिक सेवेच्या भावनेतून डॉ.राजाराम मुंडे सदोदित काम करतात हे सर्वपरिचित आहे. पेशापेक्षा आणि पैशापेक्षा सेवेला प्राधान्य देत आजपर्यंत त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात काम आहे.सामाजिक पिंडच असल्याने डॉ.राजाराम मुंडे म्हणजे सर्व स्तरातील सर्व घटकांचे "आपले डाॅक्टर"आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील लोकांशी असलेला स्नेहभाव जपताना प्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाजुला सारुन ते स्नेहभाव दृढ करतात ही त्यांची कामाची शैली आहे. सध्या कोरोनाने संपूर्ण वातावरण व्यापुन टाकले आहे.आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे.अशा काळात अनेक जण अनेक प्रकारचे आपले सेवाकार्य बजावून योगदान देत आहेत. डॉ.राजाराम मुंडे यांच्या वैद्यकीय सेवेची व्याप्ती तर खुपच मोठी आहे.अशाही परिस्थितीत घरात उपचार सुरू असणार्या जेष्ठ नागरिक रुग्णांना ते शक्य होईल तेवढ्या लोकांना घरपोच आरोग्य सेवा प्रदान करीत आहेत. ज्येष्ठांसाठी ही सेवा अत्यंत बहुमोल आहे. स्वतच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी व वृद्धापकाळ कमीत कमी त्रासात जावा, अशी भावना असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही निरपेक्ष सेवा उपयोगाची आहे.



         परळी पंचक्रोशीतील प्रसिद्ध हभप पुरुषोत्तम महाराज उखळीकर हे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधीत झाले होते.रुग्णालयात उपचार घेऊन ते बरे होऊन घरी आले. परंतु वय ९२ वर्षे त्यामुळे दैनंदिन उपचाराचा सल्ला डॉक्टरांनी दिला.उपचारासाठी रोज रुग्णालयात जाणे शक्य नाही.अशा अवस्थेत काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. डाॅ.राजाराम मुंडे यांना ही बाब समजली.हभप पुरुषोत्तम महाराज उखळीकर हे व्यक्तीमत्व सर्वांचे श्रद्धास्थान आहे. डाॅक्टरांचा आणि महाराजांचा विशेष स्नेह आहे. गेल्या अनेक दिवसापासून नियमितपणे डॉक्टर घरी जाऊन त्यांची तपासणी करतात.तसेच या रुग्णाला आवश्यक असणारे वैद्यकीय साधने,उपकरणे सुद्धा त्यांनीच उपलब्ध करुन दिली आहेत. हे सेवाकार्य सामाजिक व निरपेक्ष भावनेने सुरू आहे. कोरोना काळात या सेवाकार्याने अनेकांना मोठा आधार देण्याचे काम डॉ.राजाराम मुंडे यांनी केले आहे.

                        ⬛Video ⬛




टिप्पण्या

  1. खुप छान कार्य साहेबांचे आणी धिर खुप छान देतात देवधुताच्या कार्यास सलाम

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!