परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व मानवलोकच्या वतीने ५० खाटाच्या कोवीड विलगीकरण केंद्र सुरू.* *आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर व कर्मचारीच्या निगराणीखाली २४ तास सेवा*

 *मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व मानवलोकच्या वतीने ५० खाटाच्या कोवीड विलगीकरण केंद्र सुरू.*



*आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर व कर्मचारीच्या निगराणीखाली २४ तास सेवा*


परळी वै.ता.२३ प्रतिनिधी



महाराष्ट्र शासन व मानवलोकच्या सहकार्यातुन मोहा येथे काॅ .गंगाधरअप्पा बुरांडे स्मतृी प्रतीष्ठाणच्या पढुाकाराने ५० खाटांच्या कोविड विलगीकरण केंद्राची सुरवात झाली आहे. जिल्हयातील डोंगरी व ग्रामीण भागातील मोहा पहिलेच केंद्र असणार आहे.

परळी तालुक्यातील मोहा हे गाव डोंगरी भागातील गाव आहे. दहा किमी परिसरातील गावे ही डोंगरी भागातील आहेत. त्या सर्व गावांना मोहा सोयीचे व जवळचे गाव वाटते. मोहा परीसरातील गावांमध्ये कोरोना महामारीने कहर केला आहे. मागच्या काही दिवसात ग्रामीण भागात कोरोणा रूग्नाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आजच्या घडीला परिसरात तब्बल

६६ रुग्ण सक्रीय (अक्टीव्ह) आहेत. ग्रामीण भागात या आजारा विषयी भिती निर्माण झालेली असल्याने अनेकजण आजार अंगावर काढीत आहेत. त्यामुळे संसर्ग मोठया प्रमाणात होत आहे. परिणामी ग्रामीण भागात रूग्न वेळेवर उपचार घेत नसल्याने मृत्युचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थीतीत सतत लोककल्याणाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या मानवलोक व कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणच्या भौतीक सोयी सुविधेच्या मदतीतुन मोहा येथील

महाराष्ट्र विद्यालयात ५० खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले

आहे. या केंद्रात मोहा परीसरातील गहृ विलगीकरणाची सोय नसणाऱ्या व सौम्य लक्षणेअसणाऱ्या कोरोना

रुग्णावर २४तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहे. तरी परीसरातील संशयित

रुग्णांनी भीती न बाळगता तपासणी करून घ्यावी. आवश्यकता असल्यास योग्य उपचार करून घ्यावेत असे आव्हान काॅ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणचे कॉ. अजय बुरांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!