MB NEWS-परळीत गावठी पिस्टल सह एकास अटक*

 *परळीत गावठी पिस्टल सह एकास अटक* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

            परळी शहरातील स्वाभिमाननगर मधील एकाकडे गावठी पिस्टल असल्याचे गुप्त माहिती मिळताच परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांनी सापळा रचुन एकास अटक केली. त्यांच्याकडुन गावठी पिस्टल मँग्जीन सह जुने वापरते जप्त केले  आहे. परळी शहर डी बी पथकाने ही  कामगिरी केली आहे. 

     पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती  अशी की, दिनांक 16/05/2021 रोजी राञी 10 चे सुमारास  गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, परळी येथील स्वाभिमाननगर येथील एक ईमस थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे असी खात्रीलाईक बातमी मिळाल्याने  गोपणीय माहीती दिलेल्या वर्णणावरुन  त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची  चौकशी केली असता  त्यांनी त्यांचे नाव  संदीप भास्कर फड वय- 30 वर्ष रा. स्वाभिमाननगर परळी वैजनाथ असे सांगीतले  त्यांची अंगझडती घेतली असता  त्यांचे कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन सह असलेले मिळुन आले  त्यांच्या कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्ञ बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगीतले त्यांच्या विरुध्द भास्कर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन  गुर.नं 75/2021कलम 3/25 भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही परळी शहरचे  सहाय्यक पोलीस निरिक्षक पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे,सुंदर केंद्रे ,श्रीकांत राठोड,शरद सुर्यवंशी यांनी केली आहे पुढील तपास पोलीस जमादार चव्हाण हे करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार