MB NEWS- • *सेवाधर्म :महिला व लहान मुलांमुलींंच्या विलगीकरण केंद्रातुन कोरोनामुक्त रुग्ण निश्चिंत होऊन जातात घरी* ⬛ *_धनुभाऊ व त्यांचे सहकारी तसेच डाॅक्टर, आरोग्य सेवा देणारांचे रुग्णांकडून आभार_* ⬛

 • *सेवाधर्म :महिला व लहान मुलांमुलींंच्या  विलगीकरण केंद्रातुन कोरोनामुक्त  रुग्ण निश्चिंत होऊन जातात घरी*



⬛  *_धनुभाऊ व त्यांचे सहकारी तसेच डाॅक्टर, आरोग्य सेवा देणारांचे रुग्णांकडून आभार_* ⬛

परळी । प्रतिनिधी

     ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महिला व लहान मुलांमुलींंच्या  आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर मधील रुग्ण योग्य उपचार व मुदतीनंतर  कोरोनामुक्त रुग्ण निश्चिंत होऊन घरी जात आहेत. याठिकाणी मिळालेल्या सेवा-सुविधा, सकारात्मक वातावरण व नियमित तपासणी यामुळे रुग्णांना समाधान मिळत आहे.बरे होउन जाणारे रुग्ण धनुभाऊ व त्यांचे सहकारी तसेच डाॅक्टर, आरोग्य सेवा देणारांचे  आभार मानत आहेत.



          राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून  कोरोना बाधित महिला व लहान मुले यांच्या साठी  १०० बेडचे मोफत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रात भरती झालेल्या रूग्णांची अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे संपूर्ण काळजी घेतली जाते. रूग्णांची तज्ज्ञ डाॅक्टर्स कडून  तपासणी, औषधोपचार, पौष्टिक आहार,   योगा, प्राणायाम हे नित्य नेमाने घेतले जाते. बारीक सारीक सोयी, सुविधेवर पदाधिकारी लक्ष देतात.  सेंटरमधील सकारात्मक वातावरणामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच माजी नगरसेवक रवि मुळे हे पूर्णवेळ लक्ष देत आहेत.नुकतेच सहा रुग्ण बरे झाल्यानंतर  कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले. सेंटरमधून परततांना डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, डॉ.आनंद टिंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदींनी  रूग्णांचे अभिनंदन करून त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच काळजी घेण्यासही सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार