MB NEWS-शालेय क्रमिक पुस्तकांचा नियोजनबध्द विनियोग करून शासनाच्या शेकडो कोटी रुपयांची बचत करा चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन

 शालेय क्रमिक पुस्तकांचा नियोजनबध्द विनियोग करून शासनाच्या शेकडो कोटी रुपयांची बचत करा 



चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन

 

परळी l प्रतिनिधी

     इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतची सर्व विषयांची व सर्व माध्यमांची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येतात. मागील शैक्षणीक वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. इयत्ता १ ते ४ थी च्या शाळा उघडल्याच नाहीत तर इतर इयत्तांचे वर्ग काही दिवसच भरले त्यातच अभ्यासक्रमही कपात केला गेला. आँनलाईन शिक्षणामुळे पाठ्यपुस्तके फारशी वापरली गेली नाहीत. बंद मुळे शाळांना सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देणे शक्य झाले नाहीं त्यामुळे गतवर्षी छापण्यात आलेली पुस्तके तशीच पडून आहेत. या पुस्तकांचा विनियोग करण्यात यावा जेणेकरून दरवर्षी मराठी, इंग्रजी, उर्दूसह अनेक भाषांची पुस्तके छापण्यास येणारा शेकडो कोटी रुपयांची बचत होऊ शकते अशा आशयाचे निवेदन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे, शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहेत.

चंदुलाल यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा सर्व माध्यमांची क्रमिक पुस्तके नव्याने छापण्यासाठी राज्य सरकारला शेकडो कोटी रूपये खर्च करावे लागतात. मागील वर्षीची पुस्तके शिल्लक असतांना नव्याने पुस्तके न छापता त्याच पुस्तकांचा विनियोग केला पाहीजे. त्याचबरोबर मागील वर्षात ज्यांना पुस्तके देण्यात आलेली आहेत, त्यांना सुचना देवून ती परत मागवून  घ्यावी व शाळांकडे पडून असलेली पुस्तके चालू वर्षातील विद्यार्थ्यांना द्यावीत, यामुळे शासनाचे शेकडो कोटी रूपये बचत होऊ शकतात. त्यामुळे उपरोक्त विषयाकडे आपण लक्ष देवून हा विषय मार्गी लावावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे, शिक्षण संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !