MB NEWS-कोरोनाच्या काळात समाज हितासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा-प्रा.अतुल दुबे विविध प्रभागात प्रतिकार शक्तीवर्धक औषधींचे केले वाटप

कोरोनाच्या काळात समाज हितासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा-प्रा.अतुल दुबे


विविध प्रभागात प्रतिकार शक्तीवर्धक औषधींचे केले वाटप
परळी (प्रतिनिधी-)
कोरोनाचा विषाणू संसर्गातून वाढतो आणि इतरांच्या शरिरात तो परत पसरतो. ज्या व्यक्तीला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली त्या व्यक्तीला रोगप्रतिकार शक्ती असणे आवश्यक असून रोग होण्यापुर्वीच संसर्ग रोखणे, रोग प्रतिकार शक्ती वाढविणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने प्रतिकार शक्तीत वाढ होण्यासाठी योगासन, प्राणायाम करण्यासोबत आर्सेनिक अल्बम-३० या आयुष्यमान भारत संस्थेने प्रमाणित केलेल्या औषधींचा उपयोग करावा, असे आवाहन विद्यार्थी सेनेेचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केले आहे. 
परळी शहरातील व तालुक्यातील नागरिकांची रोग प्रतिकारात्मक क्षमता वाढविणारे आर्सेनिक अल्बम ३० लिक्वीड स्वरूपात राजस्थानी मल्टीस्टेट यांच्या सौजन्याने आरोग्य मित्र संघटनेच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या  औषधाच्या वितरण भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने परळी वैजनाथ शहरातील महात्मा बसवेश्वर कॉलनी,जिरगे नगर, प्रियानगर या भागात शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून करण्यात येत असून याची सुरुवात भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करण्यात आली.या वेळी भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा उपप्रमुख मोहन परदेशी, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे माऊली मुंडे, विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे, शहर प्रमुख गजानन कोकीळ, योगेश घेवारे हे उपस्थित होते.

डोअर टू डोअर पोहचल्या औषधी
आर्सेनिक अल्बम-३० हे द्रव स्वरुपातील औषधी असून यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरणार्‍या औषधी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आज प्रा.अतुल दुबे यांच्या माध्यमातून एक टीम डोअर टू डोअर जात औषधींचे वाटप करीत आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता आतापासूनच या लाटेला रोखण्यासाठी प्रतिबंध करित असतांनाच या औषधी डोअर टू डोअर दिल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !