MB NEWS- लेख:आधारवड....!!!!!!! ✍️प्रा.प्रविण फुटके

 आधारवड....!!!!!!!




     एक कणखर व्यक्ती म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या प्राचार्या डॉ. रेखाताई जनार्दन परळीकर या मुळच्या परळीच्या यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर धर्माबाद येथील वरिष्ट महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरीस सुरुवात केली. या महाविद्यालयात जवळपास १६ वर्षे नौकरी केल्यानंतर आपल्या जन्मगावी प्राचार्य होण्याची संधी त्यांना मिळाली. ते पण तालुक्यातील एकमेव महिला महाविद्यालयात मग काय प्राचार्य म्हणून त्यांचे कार्य या महाविद्यालयात बहरत गेले. आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त मुलींनी महाविद्यालयात येवून शिक्षण घेतले पाहिजे. फक्त प्रवेश घेऊन घरी बसता कामा नये असा कायम त्यांचा हट्ट असायचा. महाविद्यालयात विद्यार्थिनी आल्या नंतर विद्यार्थिनींने अभ्यासाबरोबरच इतर सर्व कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे. असा प्रयत्न त्या करत असत. विद्यार्थिंनीनी कोणालाही घाबरता कामा नये. मुलांसारखे राहिले पाहिजे. यासाठी त्या मुलींना प्रोत्साहन देत असत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असत. महाविद्यालयात जास्तीत जास्त इतरही कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यासाठी प्राध्यापकांनाही मदत करत. सुरुवातीच्या काळात शहरात मुलींच्या शिक्षणासाठी ऐवढे काही वातावरण चांगले नव्हते. पण प्राचार्या परळीकर यांनी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून शहरातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला गणेशोत्सव.. या गणेशोत्सवामध्ये शहराच्या इतिहासात प्रथमच मुलींचे ढोल पथक तयार केले. त्याचबरोबर लैझिम, वारकरी संप्रदाय असे अनेक देखावे तयार करुन शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल पथक ते पण मुलींचे हे शहरातील नागरीकांसाठी अचंबित करणारी व उत्साह वाढवणारी,शहरातील सांस्कृतिक वातावरण बदलवणारी ही घटना होती. मँडमने एखाद्या कार्यक्रम घेयचे ठरवले तर त्या यशस्वीपणे तो कार्यक्रम आयोजित करत असत. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच शहरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी प्राचार्य मँडमनी खूप यशस्वी प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात १२ वी बोर्डची परिक्षा असली की, शहरात १२ वीच्या सर्व केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्ग, काँप्या पुरवणारी मित्र मंडळी असायची हे वातावरण बदले पाहिजे, यासाठी त्यांनी शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी यांना एकत्र केले. या कार्यक्रमात मँडमना वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईप्पर, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बांगड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. व कधी नाही ते परिक्षा केंद्रावर फक्त विद्यार्थी दिसू लागले. पालक फक्त आपल्या पाल्याला केंद्रावर सोडून निघून जावू लागले. तीन वर्षे या काँपीमुक्तीसाठी मँडमनी सर्वांना एकत्र करत प्रयत्न केले. परळी सारख्या शहरात आज परिक्षा केंद्रावर पहिल्या सारखी जत्रा आपल्याला पाहावयास मिळत नाही. याचे कारण प्राचार्या परळीकर मँडम आहेत. यासाठी अनेक अपप्रवृत्तीच्या युवकांनी मँडमला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण मँडम कधी घाबरल्या नाहीत. प्रत्येक अडचणीत मँडम खंबीरपणे उभे राहत असत. ऐवढेच नाही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या अडचणी समजून घेत व कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत.तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी द टर्निंग पाँईंट का कार्यक्रम आयोजित करत असत. मँडम आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वतः या मार्गदर्शन कार्रक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जात असत. याचा परिणाम म्हणून महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशस्वी झाले आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येवून गोल्ड मेडल मिळवले आहेत. दोन विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिके मिळाली आहेत. तर राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थी २६ जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परेडसाठी निवड झालेली आहे.

दरम्यान आपल्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात शहरातील ८ ते १२ वीच्या विद्यार्थिनीसाठी आठ दिवसाचे कराटे शिबीराचे आयोजन केले होते. विद्यार्थिनींनी सक्षम बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. यापध्दतीने संपूर्ण शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांना त्यांचे पती माजी आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते अँड विजयराव गव्हाणे यांची मोलाची साथ लाभली. त्याच्या शहरातील व महाविद्यालयातील शैक्षणिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ऐवढेच नाही तर शहरातील मानाचा असणारा परळी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतरही अनेक पुरस्कार डॉ. परळीकर मँडम यांना प्रदान करण्यात आले होते.

 प्राचार्या डॉ रेखाताई कोरोना सोबतची लढाई मात्र हरवू शकल्या नाहीत. या आजाराने सोमवारी (ता.१७) सायंकाळी त्यांचे दुखःद निधन झाले. मँडम महिला महाविद्यालया बरोबर शहरातील शैक्षणिक क्षेत्राला पोरक्या करून गेल्या. आमच्या परिवारासोबत अनेकांचा आधारवड कोसळला. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने, महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कर्तव्यदक्ष प्राचार्या डॉ रेखाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली..

                        शोकाकुल ः

                 प्रा.प्रविण महालिंग फुटके

             कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला          

            महाविद्यालय, परळी वैजनाथ.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !