MB NEWS-प्राचार्या डॉ आर.जे.परळीकर

 प्राचार्या डॉ आर.जे. परळीकर यांनी महाविद्यालयाचा यशाचा आलेख उंचावत नेला-संजय देशमुख



*प्राचार्या डॉ आर.जे. परळीकर यांना संस्थेच्या वतीने श्रध्दांजली*


परळी वैजनाथ दि.१८ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांचे सोमवारी (दि.१७) सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. याबद्दल मंगळवारी (ता.१८) संस्थेच्या वतीने शोकसभा व श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन आँनलाईन पध्दतीने करण्यात आले होते. प्राचार्यांना श्रध्दांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले.

             राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांचे निधन झाल्याने संस्थेच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रमाचे आँनलाईन आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांनी प्राचार्या डॉ. परळीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी श्रध्दांजली अर्पण करताना अध्यक्ष संजय देशमुख यांनी प्राचार्या डॉ परळीकर यांच्या महाविद्यालयातील १५ वर्षाच्या कार्याचा आढावा मांडला. परळीकर मँडम यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख आपल्या कार्यकुशलतेने वाढवत नेल्याचे सांगितले. तसेच रवींद्र देशमुख, प्रा.प्रसाद देशमुख यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका छायाताई देशमुख, प्रा.डॉ. विद्याताई देशमुख, कार्यालयीन अधिक्षक प्रमोद पत्की यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.डॉ. यल्लावाड यांनी केले.यावेळी कोविड विषयक नियमांचे पालन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार