MB NEWS- लेख: *सेवा परमो धर्म:*धनंजय मुंडे: कार्यतत्पर पालकमंत्री* •लेखक..राहुल ताटे

 *सेवा परमो धर्म:*धनंजय मुंडे: कार्यतत्पर पालकमंत्री*



कोरोना आजाराच्या भितीमध्ये गेल्या लाटेमध्ये आपण सर्वजन जगत आहोत. दुसर्‍या लाटेमध्ये तर ही भिती तिव्र झाली आहे.मागच्या वर्षी कोरोना चीनच्या वूहान शहराची समस्या वाटली.बघता-बघता या व्हायरसचा कहर जगभर पसरला. अमेरीका सारखे बलाढ्य राष्ट्रही आपल्या हजारो नागरिकांचा जिव वाचवू शकले नाहीत.मागच्या वर्षी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी टी.व्ही.च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि कोरोना नामक न दिसणार्‍या या शत्रूशी आपले युध्द सुरु झाले.लॉकडाऊन ही नवी संकल्पना आपण एकजुटीने स्विकारली.टाळ्या-थाळ्या वाजवून अथवा दिवे लाऊन कोरोना जात नसतो.हे ही आपल्याला लवकरच कळाले.

यावर्षी पी.एम. ऐवजी सी.एम.ने टी.व्ही.माध्यमातुन जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली. आम्हा परळीकरांना संकट काळात ना पी.एम. आठवतो ना सी.एम.आठवतो. कारण संकट काळात आम्हाला आधार देण्यासाठी आमचा डी.एम. च उभा असतो. पुर्वी शहरी भागात कोरोना बाधीतांची संख्या जास्त असायची,अलिकडे कोरोनाचा शिरकाव ग्रामिण भागातही वेगाने झाल्याचे चित्र समोर येत आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाने गल्लीतुन घरात प्रवेश केला.आपल्यापैकी अनेकांनी आपले नातेवाईक,प्रियजन व मित्र कायमची गमावली आहेत. आता तर म्युकरमायकोसिस हा नवा आजार डोकं वर काढत आहे. शिवाय तिसर्‍या लाटेची ही शक्यता नाकारता येत नाही. लस हीच एकमेव आशेचा किरण आहे असे वाटते. सामाजिक अंतर,सॅनिटायजर आणी मास्क आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भविष्यात काय होईल हे अकल्पीतच वाटते.सर्वच मानवीय समस्या कोरेनाच्या समस्येपुढे खुजा वाटायला लागल्या आहेत.कोरोना बाधितांचे तर हाल विचारायलाच नको.कोरोनाबाधीत कुटुंबियाना बेड, ऑक्सीजन मिळवताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळातच जनतेला लोकप्रतिनीधींच्या मदतीची गरज जास्त भासत असते.

 सुदैवाने राज्यात अनेक लोकप्रतिनीधी आपापल्या मतदारसंघात राहुन जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे हे या कोरोनाच्या संकटात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येबरोबरच 'सेवाधर्म' या माध्यमातुन दिवस-रात्र एक करतांना दिसत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटाला ओळखुन त्यांनी तात्काळ लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे कोवीड सेंटर सर्व सुविधेनिशी सुरु केले.राज्यातील ऊसतोड मजुरांचे यशस्वी स्थलांतरही त्यांनी करून दाखवले. आलिकडच्या काळात बीड जिल्हा आरोग्य विभागाला 371 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. जिल्ह्यातील कोविड सेंटर ला वेळोवेळी भेट देऊन आवश्यक मदत ते पुरवत आहेत.परळी मतदार संघातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येविरुध्द धनंजय मुंडे साहेबांनी स्वत:च्या संकल्पनेतुन 'सेवाधर्म' उपक्रम 'सर्व काही समिष्टसाठी' राबवण्याचे ठरविले एखादे कार्य हाती दिल्यानंतर ते आपल्या हातोटीने यशस्वी करण्याची धमक असणारे विश्वासु शिलेदार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर त्यांनी या 'सेवाधर्म' उपक्रमाची जवाबदारी सोपविली. बाजीरावांनीही सहकारी कार्यकर्त्यांसह आपल्याला पूर्ण झोकून देवून हा उपक्रम जोमाने राबविण्यास सुरु केली आहे.धनंजय मुंडे साहेबांनी या उपक्रमातुन रुग्णांना नाष्टा,भोजन पुरवणे,त्यांना आवश्यक रेमडीसीवीर इंजेक्शन तसेच आवश्यक औषध सामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक खाजगी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वयंसेवक तैनात केले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी जातांना स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेता यावी यासाठी कोरोना किट,कोरोना काळात जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांना मोफत कोरोना किटचे वाटप सुरु केले आहे. मुंडे साहेबांनी महिला व लहान मुलांकरीता परळीत स्वतंत्र शेकडो बेडचे मोफत विलगीकरण केंद्र सुरु केले आहे. नुसतेच सुरु नाही तर त्यात रुग्णांना करमणुक व्हावी यासाठी टीव्ही, योगा शिक्षण देण्याचीही काळजी त्यांनी घेतली आहे.

परळीत वाढत्या संख्येपोटी त्यांनी आणखी काही शिवभोजन केंद्रे सुरु केली आहेत. म्हणतात ना जो जमिनीवर काम करतो त्यालाच जाणीव असते.कोरोनाच्या प्रादुर्भावात सामान्य नागरिक आर्थीक अडचणीत आहेत हे लक्षात घेऊन मुंडे साहेबांनी  कोरोनाबाधीत कुटुंबांना तसेच गरीब कुटुंबांतील मुलीच्या लग्नकार्यासाठी 'विवाह सहाय्यता निधी' या उपक्रमाची सुरुवात केली. या माध्यमातुन गरजुंना 10 हजार रुपयांची मदत दिली जात आहे. आलीकडे काही गरीब कुटुंबातील लोकांना ही मदत प्रत्यक्षात मिळाली आहे. सध्याच्या बिकट काळात माणूस म्हणून माणूसकी जपणे हेच आपले कर्तव्य आहे म्हणूनच मुंडे साहेबांच्या ममतेची फुंकर परळीवासीयांना दिलासा देत आहे. मुंडे साहेबांच्या या कार्यात जिवाची पर्वा न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करतांना दिसत आहेत.जिल्ह्याचे नियोजन किंग तथा नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड,शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,परळीतील उपक्रमशील नगरसेवक चंदुलाल बियाणी यांच्यासह अनेक शिलेदार या कार्यात रात्रंदिवस दिसत आहेत.

मुंडे साहेबांच्या संकल्पनेतुन लसीकरणाकरीता आपल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोफत सिटी बस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली याचा फायदा अनेकांना होतो आहे.कोरोना हाऊसच्या माध्यमातुन कर्मचार्‍यांना मास्क,सॅनीटायजर वितरण,सर्व शासकिय व अशासकिय कार्यालयात हॅन्ड फ्री सॅनीटायजर डिस्पेन्सर,पल्स ऑक्सीमीटर,थर्मोस्कॅनर,पोलीस बांधव व वैद्यकिय काम करणार्‍या सेवेकर्‍यांना फेस शिल्ड,जेवनाचे डब्बे आदींचे मोफत वाटप करत आहेत.हेल्पलाईनच्या माध्यमातुन बेड उपलब्ध करुन देणे,कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातुन अतिगंभीर रुग्णांना शिफ्ट करणे,त्यांना औषधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्व कामे वर्षभरापासुन आजतागातयत अविरत चालु आहेत. पालकमंत्री म्हणून मुंडे साहेब आपले कर्तव्य यशस्वीरित्या निभावताना दिसत आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी व बाधीत रुग्णांना उपचार मिळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरवठा सुरु ठेवला आहे. जिल्हयात उपलब्ध असलेले बेड त्या प्रमाणात लागणारा ऑक्सीजन तसेच लसीकरण प्रक्रिया यावर ते बारकाईने लक्ष देतांना दिसत आहेत.आपल्या घरातील वस्तु माणुस दुसर्‍याला देतांना हजार वेळा विचार करतो, पण मुंडे साहेबांनी सध्याची परिस्थीती ओळखून परळीतील ऑक्सीजन प्लँट अंबाजोगाई स्व.रा.ती.रुग्णालया शिफ्ट केला त्याचे नुकतेच उद्घाटनही संपन्न केले. मागच्या वर्षी साहेबांनी कोरोनासारख्या भस्मासुराला बीड जिल्ह्याच्या वेशीवरच रोखले होते. परंतू जिल्हाबंधी उठली आणी कारोनाने परळीत शिरकाव केला. साहेबांना याची चैन पडेना माझ्या परळीकरांना याचा त्रास होऊ नये परळीत त्याचा शिरकाव होऊ नये यासाठी त्यांनी मुंबईच्या वरळीतील 'वनरुपी क्लिनीक'च्या डॉक्टरांना परळीत बोलावले. परळी शहरातील सर्व नागरकांची तपासणी ट्रेसींग सुरु केली. पी.पी.ई.कीटचे वितरण केले. आपल्या गरीब लोकांचे लॉकडाऊन मुळे हाल होत असतांना पाहुन त्यांनी हजारो कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप केले.भाजीमंडई बंद झाली लोकांना ताजा भाजीपाला स्वत:च्या नाथप्रतिष्ठाणच्या माध्यमातुन खरेदी करुन मोफत भाजीपाला वाटप केला. या काळात अनेक कोरोना बधितांना रात्रीबेरात्री मदत करुन जिव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. आजही खूप कोरोना मुक्त झालेले रुग्ण फक्त साहेबांमुळे वाचलो अश्या प्रतिक्रीया देतात. आज बीड जिल्हयात रुग्णसंख्येचा उतरता आलेख आपणास दिसत आहे. हे यश जिल्हा प्रशासकिय यंत्रणे बरोबरच पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचे आहे.

भोवतालच्या परिस्थीतीची जाणीव,स्वत:चा दृष्टीकोन, विचार कसा करावा हे मुंडे साहेबांकडून इतर लोकप्रतिनीधींनी शिकण्यासारखे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूकांच्या माध्यमातुन आपण लोकप्रतिनीधी निवडतो पण खरंच आमच्या परळीकरांचे काहीतरी पूण्य आहे की असा लोकप्रतिनीधी आम्हाला मिळाला आहे. देशात पी.एम. राज्यात सी.एम. संकटात आमच्या मागे फक्त डी.एम.





राहुल वि.ताटे

न्यू प्रायमरी स्कुल,परळी वै.

मो.9922179797

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !