MB NEWS- *वृद्धाश्रमात अन्नदान करुन प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचा दशक्रियाविधी*

 *वृद्धाश्रमात अन्नदान करुन प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचा दशक्रियाविधी* 



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

      मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व परिचित व परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे.परळीकर  यांच्या दुःखद निधनानंतर आज दहाव्या दिवशी वृद्धाश्रमात अन्नदान करुन दशक्रियाविधी करण्यात आला

     कै.प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असायचा. वंचित, उपेक्षित घटकांना प्रसिद्धीपासून दुर राहत त्या आधार देण्याचे काम नेहमीच करत असत. शिक्षणापासुन कोणी वंचित राहत असेल तर त्याला आवश्यक ती मदत परळीकर मॅडम आवश्य करत असायच्या. विशेष म्हणजे आणि आजपर्यंत कोणालाही न सांगता त्यांनी केलेले उदात्त काम म्हणजे दरवर्षी एक गरजु विद्यार्थी त्या शैक्षणिक दत्तक घेत.त्या विद्यार्थ्यांना रोजगार लागेपर्यंत त्याची संपूर्ण जबाबदारी परळीकर मॅडम पार पाडत होत्या. असा सामाजिक दृष्टीकोन आयुष्यभर जपलेल्या प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांचा कोविडविषयक नियमांचे पालन करत  पैठण येथे गोदावरी तिर्थस्थानी दशक्रिया विधी करण्यात आला.तसेच मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना अन्नदान करण्यात आले.यावेळी पती माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे,मुलगी रिया,अन्य कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार