MB NEWS- लेख: *सेवा हाच धर्म आणि कार्यतत्परता हेच अविरत कर्म:ना.धनंजय मुंडेंची जिल्ह्यात 'जबाबदार कुटुंबप्रमुखाची' भुमिका* ✍️मोहन साखरे

 सेवा हाच धर्म आणि कार्यतत्परता हेच अविरत कर्म:ना.धनंजय मुंडेंची जिल्ह्यात 'जबाबदार कुटुंबप्रमुखाची'  भुमिका




      कोरोना महामारीने जग विळख्यात सापडले.रक्ताचे नाते असो की सख्खे कोणीच कोणाला आधार देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.उपचार, जीवनावश्यक बाबी ,आधार ,सेवा असे कितीतरी विषय समस्या म्हणून पुढे येऊन उभे राहिले. अशा भयावह आणि विदारक परिस्थितीत खंबीर,विश्वासनिय एक अश्वासक नाव परळी मतदार संघ आणि बीड जिल्ह्यातील तमाम लोकांना खुणावत राहिले ते म्हणजे आपलं नेतृत्व ना.धनंजय मुंडे.सेवा हाच धर्म आणि कार्यतत्परता हेच अविरत कर्म हेच अखंड व्रत घेऊन काम करणारे ना.धनंजय मुंडे म्हणजे बीड जिल्ह्यातील घराघरातील हक्काचा व जबाबदार 'कुटुंबप्रमुख ' कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण बनले आहेत.

          बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे हे या कोरोनाच्या संकटात गेल्या दोन वर्षांपासून 'आधार ' म्हणून उभे आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटाला ओळखुन त्यांनी तात्काळ लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे कोवीड सेंटर सर्व सुविधेनिशी सुरु केले. यावर्षी बीड जिल्हा आरोग्य विभागाला 371 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स मिळवून दिले. एखादे कार्य हाती दिल्यानंतर ते आपल्या हातोटीने यशस्वी करण्याची धमक असणारे नेतृत्व व त्यांचे शिलेदार वाल्मिक अण्णा कराड व अन्य सहकारी दिवसरात्र कोरोनाकाळात या सेवाकार्यात गुंतलेले असतात.वाल्मिक अण्णा कराड हे सहकारी कार्यकर्त्यांसह पूर्ण झोकून देवून सेवाकार्य जोमाने राबविण्यात येत आहे.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सर्व स्तरातील उपक्रमातुन रुग्णांना नाष्टा,भोजन पुरवणे,त्यांना आवश्यक रेमडीसीवीर इंजेक्शन तसेच आवश्यक औषध सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली.सध्याच्या बिकट काळात माणूस म्हणून माणूसकी जपणे हेच आपले कर्तव्य समजून करण्यात येत असलेले सेवाकार्य परळीवासीयांना दिलासा देत आहे.

          परळीकरांना संकट काळात ना पी.एम. आठवतो ना सी.एम.आठवतो. कारण संकट काळात आम्हाला आधार देण्यासाठी आमचा डी.एम. च उभा असतो. पुर्वी शहरी भागात कोरोना बाधीतांची संख्या जास्त असायची,अलिकडे कोरोनाचा शिरकाव ग्रामिण भागातही वेगाने झाल्याचे चित्र समोर येत आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाने गल्लीतुन घरात प्रवेश केला.आपल्यापैकी अनेकांनी आपले नातेवाईक,प्रियजन व मित्र कायमची गमावली आहेत. आता तर म्युकरमायकोसिस हा नवा आजार डोकं वर काढत आहे. शिवाय तिसर्‍या लाटेची ही शक्यता नाकारता येत नाही. लस हीच एकमेव आशेचा किरण आहे असे वाटते. सामाजिक अंतर,सॅनिटायजर आणी मास्क आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भविष्यात काय होईल हे अकल्पीतच वाटते.सर्वच मानवीय समस्या कोरेनाच्या समस्येपुढे खुजा वाटायला लागल्या आहेत.कोरोना बाधितांचे तर हाल विचारायलाच नको.कोरोनाबाधीत कुटुंबियाना बेड, ऑक्सीजन मिळवताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळातच जनतेला लोकप्रतिनीधींच्या मदतीची गरज जास्त भासत असते. ही अविरत मदत ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुरू आहे.

           एखाद्या कुटुंबात ज्याप्रमाणे कुटुंबप्रमुखाला स्वतः:चार विचार, स्वतः चे दुःख, समस्या बाजुला ठेवून कुटुंबातील प्रत्येकाची बारीक सारीक,छोटी मोठी कामे व सुविधा पुरवाव्या लागतात.एवढंच नाही तर कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा, आरोग्य, शिक्षण,उदरभरण याबरोबरच मानसिक स्वास्थ्य अशा सर्व चे पैलुवर लक्ष ठेवून जबाबदारी पार पाडावी लागते.याच भुमिकेतून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे कार्य सुरू आहे.सेवा हाच धर्म आणि कार्यतत्परता हेच अविरत कर्म हेच अखंड व्रत घेऊन काम करणारे ना.धनंजय मुंडे म्हणजे बीड जिल्ह्यातील घराघरातील हक्काचा व जबाबदार 'कुटुंबप्रमुख ' कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण बनले आहेत.

     


-मोहन साखरे, परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार