MB NEWS-प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे निधन* *_परळीच्या शैक्षणिक क्षेत्रातील 'रणरागिणी' हरवली ; शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी_*

 *प्राचार्या डॉ.रेखाताई परळीकर यांचे निधन*



 *_परळीच्या शैक्षणिक क्षेत्रातील 'रणरागिणी' हरवली ; शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी_*

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

         मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व परिचित व परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर.जे.परळीकर यांचे औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना आज सोमवार (दि.१७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी त्या ५६ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असुन परळीच्या शैक्षणिक क्षेत्रातील 'रणरागिणी' हरवली असल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.

           प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर यांना गेल्या पंधरा दिवसांपासून काहीसा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रेखाताई जनार्दन परळीकर तथा डॉ.आर.जे. परळीकर यांनी अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. २००३ पासून परळी येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून त्या रुजु झाल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. परळीतील काॅपीमुक्त पॅटर्न च्या त्या प्रमुख होत्या. परळीभुषण म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे.

            शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदार्यांबरोबरच विविध सामाजिक स्तरावरील उपक्रमांत अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. विविध शैक्षणिक परिषदा, अधिवेशनांमध्ये त्यांनी अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले होते. परळीत स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र बीसीएस,बीसीए महाविद्यालय स्थापन केले.त्याचबरोबर डॉ.जे.आर.शिंदे सीबीएससी ज्यु.काॅलेज,रेन्बो व केंब्रिज इंग्लिश स्कूल आदी संस्थांच्या त्या संस्थापिका आहेत. महाराष्ट्रात सर्वदुर शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यांची वक्तृत्वाची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. त्यांनी आपल्या अमोघ आणि सडेतोड भाषणांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विशेष गुण होता. परळीतील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. अनेक महत्वाच्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमातचे त्या सक्रीय सहभागी असायच्या. अनेक विषयांवर त्यांनी प्रबंध सादर केलेले आहेत.मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच रशियन भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. 

          सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. अनेक विषयांवरचा त्यांचा व्यासंग होता. अल्पशा आजाराने झालेल्या त्यांच्या निधनामुळे परळीच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ.आर.जे.परळीकर यांच्या पश्‍चात आई, मुलगी,पती असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परळीतील शैक्षणिक क्षेत्रातील 'रणरागिणी' हरवली असल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !