परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌ ; मोहा गावातील रुग्ण संख्या शून्य होण्यासाठी या कक्षाची मदत होणार - बाबुराव रुपनर

 जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌ ;



मोहा गावातील रुग्ण संख्या शून्य होण्यासाठी या कक्षाची मदत होणार - बाबुराव रुपनर 


परळी‌ वैजनाथ दि २६ (प्रतिनिधी) :-

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अदृश्य अशा शत्रु विरोधात संपूर्ण जग लढताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारा मृत्युदर हे गंभीर विषय आहेत. सोबतच, मोहा शिवारामध्ये सुद्धा दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत कार्यालय मोहा व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.कें.प्रा.शाळा मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करणारी जिल्ह्यातील मोहा ग्रामपंचायत हे एकमेव असल्या कारणाने या ठिकाणच्या सरपंच सौ रुक्मिणीबाई पांडुरंग शेफ व पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाने अभिनंदन केले आहे.

 या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विष्णुपंत देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे, सरपंच प्रतिनिधी पांडुरंग शेफ, सिरसाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे आदी उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नायब तहसीलदार बाबुराव रुपनर साहेब यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या योग्य नियोजनाचे कौतुक केले व सदरील विलगीकरण केंद्रामुळे मोहा गावातील रुग्ण संख्या शून्य होण्यास मदत होणार आहे. अशा कक्षांचे उद्घाटन करताना आनंद होत नसून दुःख आणि मनामध्ये खेद होत आहे. कारण समाजावर आतापर्यंत अशा महामारीची वेळ कधीही आली नव्हती आणि इथून पुढेही अशी वेळ येऊ नये.असे मत व्यक्त केले.

त्याच बरोबर याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना असे विलगीकरण कक्ष गावोगावी स्थापन करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे गावामध्ये या विषाणूचा संसर्ग होणार नाही.  एका रुग्णामुळे इतर सुद्धा बाधीत होत असल्याने अशा व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात यावे. सोबतच संशयित रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना सुद्धा विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे असे सांगितले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहा गावचे उपसरपंच संदीप देशमुख यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षाची सविस्तर माहिती दिली.

सर्व कोरोना विषयक नियमांचे पालन करीत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थित सदरील संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विघ्ने साहेब,प्रा.आ.केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल शिंदे व डॉ.विनोद गडदे,भागवत देशमुख,शैलेंद्र पोटभरे, रावसाहेब देशमुख, शरद देशमुख, अशोक देशमुख, बलभीम शेरकर, परमेश्वर आप्पा देशमुख, विलासराव देशमुख, बबन शेरकर, नितीन शिंदे, रवींद्र पोटभरे सह सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राहुल पोटभरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शैलेंद्र पोटभरे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!