परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- *राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलने राज्यभरात हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करावी-ना.धनंजय मुंडे* _परळीतील सेवाधर्म उपक्रम सर्वांसाठी आदर्श-डाॅ.नरेंद्र काळे_ *सेवाधर्म उपक्रमांतर्गत आता हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन*

 *राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलने राज्यभरात हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करावी-ना.धनंजय मुंडे*



_परळीतील सेवाधर्म उपक्रम सर्वांसाठी आदर्श-डाॅ.नरेंद्र काळे_


*सेवाधर्म उपक्रमांतर्गत आता हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन*


   *परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

           सध्याच्या कठीण काळात शक्य तेवढ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.परळीत सेवाधर्म उपक्रमांतर्गत आता हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू केली ही आनंदाची बाब आहे.राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलने राज्यभरात हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करावी अशी अपेक्षा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.तर परळीतील सेवाधर्म उपक्रम सर्वांसाठी आदर्श असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.नरेंद्र काळे यांनी सांगितले.

         

       ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत आता सर्वांना अतिशय उपयुक्त ठरणारी हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली. आज( दि.१९) ना.धनंजय मुंडे व डॉ. नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत आॅनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी नागरीक व रुग्णांची गरज लक्षात घेऊन सर्वांना अतिशय उपयुक्त ठरणारी हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. आज-काल दैनंदिन जीवनामध्ये वातावरणातील बदल व अन्य कारणांमुळे शारिरीक व्याधी निर्माण होतात.सध्या कोविड १९ ने वातावरण व्यापुन टाकले आहे.या परिस्थितीत रुग्णांत मोठ्या प्रमाणावर भिती निर्माण झाली आहे.परंतु घाबरून जाऊन काही साध्य होणार नाही.यासाठी काळजी व योग्य निदान, उपचार आवश्यक आहे. मात्र सोशल डिस्टंसिंग व कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागते अशा परिस्थितीत प्रत्यक्षात डॉक्टरांकडे जाणे,प्रत्यक्ष उपचार घेणे यासाठी बंधने आली आहेत.यामध्ये टेलीफोन कॉन्फरन्स द्वारा डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना उपचार करता येऊ शकतो. यासाठी हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली. यावेळी सुमेध नरवाडे यांनी आॅनलाईन उद्घाटन साठी तंत्रसहाय्य केले. याप्रसंगी समन्वयक डॉ.संतोष मुंडे, डॉ.आनंद टिंबे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे ,शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व सेवा मिळवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक:०२४४६-२२८७७७ व वाॅटसप क्रमांक:९३०९७७७३१५ यावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!