परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी तालुका क्रीडा संयोजक बालाजी अनकाडे यांचे निधन;परळीच्या क्रीडा क्षेत्रातील शांत व संयमी चेहरा हरवला
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
परळी शहरात विविध क्रीडा उपक्रमांतर्गत हिरीरीने भाग घेत क्रीडा चळवळ सक्रिय करण्यात मोलाचे योगदान असणारे सर्व परिचित क्रीडा शिक्षक तथा परळी तालुका क्रीडा संयोजक बालाजी अनकाडे यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ५५ वर्षे वयाचे होते.त्यांच्या निधनाने परळीच्या क्रीडा क्षेत्रातील शांत व संयमी चेहरा हरवला आहे.
श्री. बालाजी अनकाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून परळीत शिक्षक म्हणून सेवेत आहेत.मुळचे कंधार जि.नांदेड येथील अनकाडे सर यांनी परळी तालुका क्रीडा संयोजक म्हणून चांगली जबाबदारी पार पाडली जिल्हा परिषद कन्या प्रशाला परळी वै येथे ते सेवेत होते.परळी तालुक्यात क्रीडा स्पर्धा संयोजक म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले.परळीतील क्रीडासंबंधी सर्व उपक्रमात ते नेहमी सक्रीय सहभागी असायचे.विविध शिबीरे, क्रीडा स्पर्धा, विविध संस्था, संघटना आयोजित क्रिडाविषयक उपक्रमांत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. त्यांना जिल्हा स्तरीय आदर्श क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे तसेच परळी न प चा आदर्श क्रीडा पुरस्कार, परळी भूषण पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत.अतिशय मनमिळाऊ सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक संयमी व शांत व्यक्तीमत्व म्हणुन ते सर्व परिचित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा