MB NEWS- *खतांचे भाव तात्काळ कमी करा अन्यथा आंदोलन-पूजा मोरे*

 *खतांचे भाव तात्काळ कमी करा अन्यथा आंदोलन-पूजा मोरे*



बीड....

कोरोणाचे संकट,सततचे लॉकडाऊन,पडलेले बाजार भाव,नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदरच तोटा झालेली असताना रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीने बळीराजा अडचणीत सापडला आहे त्यामुळे खतांच्या किमती तात्काळ कमी करा नसता आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केले आहे.


रासायनिक खतांचा वापर केला नाही तर पीक जोमात येणार नसल्याची भीती आहे.तर शासनाने रासायनिक खत आणि त्यासंदर्भातील कंपनी यांच्यावरील शासन अनुदान काढून घेतल्यामुळे किमती वाढल्याचे चित्र आहे. लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाली आहेत. काही दिवसात मृगनक्षत्र येणार आहेत.मृगनक्षत्र सुरू झाले की खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड सुरू होते.पीक जोमाने वाढावे यासाठी लागवडीनंतर अवघ्या चार दिवसात रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. सुरुवातीपासूनच रासायनिक खत दिल्यावर पीक जोमात येते परंतु खत नसेल तर पीक जमीन सोडत नाही. त्यामुळे खत महत्त्वाचे असते. खतांच्या वाढलेल्या किमती आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतीची मशागत आणि पिकासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. भरघोस पीक घेण्यासाठी येणारा खर्च वाढून त्या तुलनेत बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे आम्ही भारताचे शेतकरी आपल्याला कळकळुन विनंती करतो की, शेतकरी जर वाचवायचा असेल तर केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन खतांच्या किंमती कमी कराव्यात अश्या आशयाचे पत्र पूजा मोरे ई-मेल द्वारे पंतप्रधानाना केली आहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी narendramodi1234@gmail.com या मेल वर मागणीच्या संदर्भात मेल करावा व ट्विटर वर #stopfertilizerhike असे हॅशटॅग खाली एकत्रित या असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !