इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,यांच्या तर्फे चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांच्या अल्पोपहार व चहापाण्याची सोय*

 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,यांच्या तर्फे चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांच्या अल्पोपहार व चहापाण्याची सोय*



परळी वैजनाथ - सध्या देशात कोरोना या महामारीने थैमान घातले असून, सर्वञ ताळेबंदी करण्यात आलेली आहे. या काळात सर्वच हाॅटेल, रेस्टॉरंट बंद आहेत म्हणून शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तर्फे चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, न.प. कर्मचारी यांच्या चहापाण्याची सोय मागील कडक ताळेबंदी पासुन करण्यात आली आहे. 

यावेळी राकेशजी मोरे, प्रल्हाद बिडगर, प्रा.अतुल दुबे,गोपालजी व्यास, दिनेश लोंढे,गणेश जोशी, पुणेश नाईक, राजू जाधव,प्रमोद औटी, विश्वंभर देशमुख,बालाजी शहाणे, मनोज कुलकर्णी,सुनिल कौलवार, नवल वर्मा, शुभम आघाव,आकाश कंदले, आदित्य ईत्यादी परिश्रम घेत आहेत.जो पर्यंत हा लाँकडाऊन चा कार्यकाळ आहे तो पर्यंत कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांना रोज अल्पोपहार व चहापाणी चालू राहिल असे या वेळी सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या