MB NEWS-हरिहर जोशी यांचे निधन*

 *हरिहर जोशी यांचे निधन*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   मुळ परळी येथील असलेले बीड येथील अंबिका नगर पोस्टमन कॉलनी येथे राहणारे व बीडच्या दूरसंचार / टपाल कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री हरिहर ( दिलीप ) जगमित्र जोशी यांचे आज पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते. परळी येथील प्रसिद्ध वेदशास्त्र संपन्न स्व. जगमित्र गुरू जोशी यांचे ते चिरंजीव होत.

        हरिहर ( दिलीप ) जोशी हे मूळ परळी वैजनाथ येथील रहिवाशी होते. मात्र नोकरीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बीड येथेच स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, पत्नी, सूना असा परिवार आहे. अत्यंत शांत, सरळ मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते सर्व परिचित होते. परळी येथील प्रशांत जोशी ( स्वीय सहाय्यक धनंजय मुंडे ) यांचे ते चुलते होते. त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात दै....... परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !