MB NEWS- *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील रूग्णांना मिळतोय गोपीनाथ गडावरील आंब्यांचा गोडवा !* *पंकजाताई मुंडे घेत असलेल्या काळजीबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यांवर कृतज्ञतेचे भाव*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील रूग्णांना मिळतोय गोपीनाथ गडावरील आंब्यांचा गोडवा !*



*पंकजाताई मुंडे घेत असलेल्या काळजीबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यांवर कृतज्ञतेचे भाव* 


परळी । दिनांक २०। 

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत सुरू असलेल्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरमधील रूग्णांना दररोजच्या जेवणात गोपीनाथ गडावरील मधुर आणि रसाळ आंब्यांची चव चाखायला मिळत आहे. पंकजाताई मुंडे यांच्या आग्रही सूचनेनुसार प्रतिष्ठानच्या टीमने अक्षय्य तृतीयेपासून रूग्णांच्या दैनंदिन आहारात याचा समावेश केल्याने जेवणाची लज्जत आणखी वाढल्याचे समाधान रूग्णांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे.


  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना आंबा, चिंच, बोरं, जांब अशी विविध प्रकारची फळं खूप आवडायची. या सर्व फळांची झाडे पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर लावलेली आहेत. सध्या मोसम असल्याने मोठया प्रमाणावर आंबे आले आहेत. सदर आंबे लोकनेत्याचा 'प्रसाद' म्हणून आयसोलेशन सेंटर मधील रूग्णांना द्यावीत अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केली होती, त्यानुसार त्यांनी गडावरील आंबे सेंटरमध्ये पोहोचवली. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णांना अक्षय्य तृतीयेपासून त्यांच्या दररोजच्या जेवणात ही मधुर व रसाळ आंबे दिली जात आहेत. या आंब्याने रूग्णांच्या जेवणाची लज्जत अधिकच वाढली आहे. सेंटरमधील रूग्णांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देण्याबरोबरच त्यांच्या आहाराचीही देखील तितकीच काळजी घेणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यावर समाधान व कृतज्ञतेचे भाव दिसून आले.


*शंभराहून अधिक कुटुंबांना घरपोच भोजन* 

----------------------------

मोफत भोजन व्यवस्थेतंर्गत शहरातील शंभर हून अधिक कोरोना बाधित कुटुंबांना प्रतिष्ठान मार्फत सध्या दोन वेळा घरपोंच भोजन देण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज त्यासाठी मेहनत घेत आहेत. आयसोलेशन सेंटरमध्ये आतापर्यंत ११४ रूग्णांवर उपचार करण्यात आले, त्यापैकी ६५ रूग्ण कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार