इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-परळी न.पचे सहाय्यक अधिक्षक दिलिप रोडे यांचे दुःखद निधन

 परळी न.पचे सहाय्यक अधिक्षक दिलिप रोडे यांचे दुःखद निधन



परळी 


परळी नगर परिषदचे सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक दिलीप रोडे यांचे राञी 1-15 वाजण्याच्या सुमारास लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.

दिलीप रोडे हे काही दिवसापुर्वी कोरोना पाॕझिटिव झाले होते.काही दिवस त्यांनी कोरोनावर उपचार घेऊन त्यातुन यशस्वी बाहेर पडले होते.परंतु परत त्यांची प्रकृती खालावत जात असल्याने त्यांना लातुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.त्यातच उपचारा दरम्यान मंगळवार दि.18 मे रोजी पहाटे 1-15 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

परळी नगर परिषदेत त्यांनी 30 वर्ष सेवा दिली असुन ते आत्ता सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक पदावर कार्यरत होते.न.प.मधील एक आदर्श अधिकारी म्हणुन त्यांच्याकड पाहीले जात होते.प्रत्येकासी जिवाळ्याचे नाते होते अश्या सुस्वभावी व्यक्तीला आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिलिप रोडे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली एक मुलगा,भाऊ असा परिवार आहे.रोडे परिवारावर कोसळलेल्या दुःखात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या