MB NEWS-केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध

 केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध 


*परळी वै : दि.२६ अनुप कुसूमकर*


 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतमजूर युनियन,(लाल बावटा,) डीवायएफआय युवक संघटना, एसएफआय विद्यार्थी संघटना या विविध संघटनेच्या वतीने मोहा येथे बुधवार दि 26 रोजी निषेध दिन म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.


दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारने राबवत असलेले जनता विरोधी प्रतिगामी धोरणांच्या विरोधात देशव्यापी काळा दिवस पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने केंद्रातील सत्तेचा निषेध दिवस पाळण्यात आला.

भारतीय नागरिकांनी मोठ्या आशेने देशाचा विकास होईल या भ्रमात भाजप सरकारला एकहाती सत्ता दिली.या घटनेला आजमितीस ७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ७ वर्षाच्या कालावधीत देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कट कारस्थान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले. 

राष्ट्रीय उत्पन्नात घट आणि महागाईत वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव तिप्पट झालेले आहे. कृत्रिम साठेबाजीला अप्रत्यक्ष खतपाणी घातले जात आहे. भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. कोरोनाचा धोका दिसत असताना सुद्धा या ठोस अमलबजावणी न करता कोरोना काळात कामात ढिलाई दाखविल्यामुळे देशाला याचे फळ भोगत आहे.मागील 6 महिन्यापासून सुरू अससलेले शेतकरी आंदोलन विविध मार्गाने दडपून टाकण्याचे काम सुरू आहे या सर्व मागण्या घेऊन केंद्रातील सरकारच्या विरोधात २६ मे हा दिवस निषेध दिन आणि देशव्यापी काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार केलेला होता. त्या अनुषंगाने मोहा गावात काळे झेंडे घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला 


या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.अजय बुरांडे,

मोहाचे माजी सरपंच कॉ.सुदाम शिंदे,

कॉ.सखाराम शिंदे, कॉ. प्रवीण देशमुख,

कॉ.खय्युम शेख , कॉ.विनायक राजमाने, कॉ.सखाराम शिंदे, युवक संघटनेचे कॉ. विशाल देशमुख, कॉ.मनोज देशमुख, कॉ.बाळासाहेब शेप,कॉ.मदन वाघमारे विद्यार्थी संघटनेचे साथी अशोक शेरकर, साथी अंकुश कोकाटे, साथी प्रवीण शिंदे , कॉ.वैजनाथ पाळवदे, आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात केंद्रातील मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !