MB NEWS- लेख:तुज विन वैद्यनाथा आम्हा कोण तारी! ⬛ गोपाळ आंधळे

 तुज विन वैद्यनाथा आम्हा कोण तारी!



बुडताहे जण न देखवे डोळा 

म्हणून प्रभू वैद्यनाथा विनवितो तुम्हा. 

गेली दोन वर्षे झाली कोरोनाच्या महामारीने अख्ख जग संकटात आहे. विज्ञान, वैद्यकीयशास्त्रातील तज्ञ, आयुर्वेदाचे तपस्वी, शासन, प्रशासन, नेते, अभिनेते या सर्वांचे प्रयत्न पाहिले, अनेकांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. तर दुसरीकडे या संकटाला संधी म्हणून आपल्या आत्ताच्या व पुढच्या दहा पिढ्यांचं कल्याण साधलं. या संकटात माणसातील देवमाणसं ही दिसली आणि माणसातील सैतानंही बघायला मिळाली. 

परंतु हे प्रभू वैद्यनाथा तुम्ही तर समुळ वैद्यांचे "नाथ"आहात. म्हणून आपल्याला वैद्यनाथ म्हटले जाते. आपण साक्षात धन्वंतरी! परंतु आमची अवस्था त्या हरणा सारखी झाली आहे. कस्तुरी स्वतः च्या शरिरात असताना आम्ही माञ सैरा-वैरा भटकत आहोत. कारण आम्ही कर्मांध आहोत. विज्ञान युगात वावरत असल्याने आणि सत्ता, संपत्ती च्या नशेत तुझ्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिलो. त्यात आमचा पण दोष तो काय?हे कलियुग तुच निर्माण केले आहेस. ते युग तर आपला खरा चेहरा तर दाखवणारच!परंतु घरात बापाचच अस्तित्व नाकारणार्या जशा औलादी आहेत तसे आई-बापाला देव मानून पुजा करणारे पण कमी नाहीत. 

एखाद मुल आई च्या किंवा बापाच्या मांडीवर लघुशंका केली म्हणून आई बाप काही मांडी कापत नाहीत किंवा लेकराचा गळा कापत नाहीत. हे प्रभू वैद्यनाथा तुच आपचा माय बाप, बंधू, सखा आमचं सर्वस्व तूच आहेस. तुच असा कोपलास तर आम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेऊन रडायचं. देवा तूला संत जनाबाई सारख्या शिव्या देण्या ऐवढा आमचा अधिकार व भक्ती नाही. म्हणून केवल आर्त टाहो फोडण्या शिवाय ,आणि तुझ्या पुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. 

आम्ही चुकलो असतोल, आम्हाला तुझ्या अस्तित्वाचा विसर पडला असेल. तर भगवान प्रभू वैद्यनाथाचा तू मातृह्द्यी आहेस. तू आम्हाला माफ कर. संत ज्ञानेश्वरांनी खंळाचं खळ पण जाऊन त्यांची सत्करमी रती जडो असे पसायदान मागितले होते. तसेच आम्ही तुझी लडिवाळ लेकरं समजुन पदरात घे आणि या संकटातून लवकर आमची सुटका कर!

तुझ्या भेटी साठी बंद असलेलं दार लवकर उघड देवा. 

हर हर महादेव!

प्रभू वैद्यनाथ भगवान की जय. 

आमची नुसती श्रध्दा नाही तर ठाम विश्वास आहे. देवा तुच या महामारीला थांबवशील. 

हरि हर तिर्थ काट ओला कशानं गं झाला, 

देव बैजू बा गं माझा जटा निथळित गेला!



गोपाळ रावसाहेब आंधळे 

सचिव 

प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समिती 

परळी वैद्यनाथ 

9823335439

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार