MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: आज दुपारी १२पर्यंत बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना ;गर्दीचा फायदा चोरीच्या घटना

 परळीत चोरट्यांना अनलाॅक: आज दुपारी १२पर्यंत  बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना ;गर्दीचा फायदा चोरीच्या घटना 



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      अनलाॅकनंतर बाजारात गर्दी जमली आहे. परळीत पोलीस प्रशासन गुन्हेगारी पुढे हतबल आहे. शहरातील दोन ठाणे व त्यांच्या हद्दी या तांत्रिक घोळात सगळ्या घटना घुटमळत असतात.कालच्या गाड्या फोडाफोडी च्या घटना ताज्या असतानाच आजआठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.आज रोजी दुपारी १२ वा.पर्यंत पाच नागरिक तक्रार घेऊन पोलीसांपर्यंत आले आहेत.पोलीसांपर्यंत न आलेले अनेक जण आहेत.

       बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल,पर्स चोरीच्या घटना  वाढलेल्या बघायला मिळत आहेत.या अनुषंगाने पोलीस बाजाराच्या दिवशी प्राधान्याने लक्ष ठेवून आहेत.मात्र चोरटे सुसाट आहेत.बाजारात पोलीस असताना ही जवळपास पाच जणांच्या मोबाईलवर डल्ला अज्ञात चोरट्यांनी मारला आहे.याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहे.आज आठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार