MB NEWS-राज्यातील शाळा उद्यापासून ऑनलाईन माध्यमातून सुरू होणार!*


------------------------------------------ 

*⭕  राज्यातील शाळा उद्यापासून ऑनलाईन माध्यमातून सुरू होणार!*

------------------------------------------ 



कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सलग दुसऱ्या वर्षी उद्या 15 जूनपासून ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. 


प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.


शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे, अशी माहिती शालेय शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. शाळा प्रत्यक्षात सुरू करण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच शाळा तूर्तास ऑनलाईन माध्यमातूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे. 15 जूनपासून ऑनलाईऩ आणि इतर शक्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. यासंदर्भात पत्रक जारी करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये, याचीही खबरदारी घेण्यास सांगण्यात येईल. राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने टप्प्यांनुसार लॉकडॉऊनचे निर्बंध लागू केले आहेत. शाळा सुरू करत असताना सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत.


 आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात,असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाळा नेमक्या कोणत्या पद्धतीने सुरू करायच्या? शाळा ऑनलाईन असणार की ऑफलाईन? कोणत्या इयत्तेला किती तास शिकवायचे? अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !