MB NEWS- *"परळीत देउळबंद" : शेकडो कुटुंबांच्या रोजीरोटीच्या अनेक समस्या उभ्या !* *सगळं झालं सुरू मग मंदिरं सुरू करण्यातच काय अडचणी? - भाविकांचा सवाल*

 *"परळीत देउळबंद" : शेकडो कुटुंबांच्या रोजीरोटीच्या अनेक समस्या उभ्या !*



*सगळं झालं सुरू मग मंदिरं सुरू करण्यातच काय अडचणी? - भाविकांचा सवाल*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..

     कोरोनाकाळात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले वैद्यनाथ मंदिर बंदच आहे.सध्या या देउळबंद अवस्थेत मंदिरांची दारं बंद असल्याने भाविकांची श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन वाहिली जात आहे.मंदिरे बंद झालीत तशी अनेकांची जगण्याची दारे देखील बंद झालीत.  या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्या केल्यात देवस्थानावरील अवलंबून असलेली छोटी मोठी व्यवसाय करणारी शेकडो शेकडो लोकांची कुटुंबं आता अस्वस्थ आहेत.

         कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परळीचे प्रभू वैद्यनाथ मंदिर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बंदचा हा कालावधी आणखी किती दिवस राहतो हे अनुत्तरित आहे. जिल्ह्यात सर्वकाही सुरू करण्यात आले आहे मात्र जिल्हाधिकारी, बीड यांनी मंदिरबाबत कोणतेही आदेश अद्याप काढलेले नाहीत. प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर बंद असले तरी दैनंदिन पूजा विधी पुजाऱ्यांच्या मार्फत चालू  आहे.

   

     मंदिर बंद असल्यानं अनेकांची जगण्याची दारे देखील बंद झालीत. मंदिर परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिक, गाडी लावून छोटे व्यावसाय करणारे व्यावसायिक, परिसरातील चहाचे ठेले, फुलवाले, प्रसादविक्री, अॅटोचालक, पुरोहित, मंदिर प्रशासनात कामं करणारी कामगार,स्वच्छता कर्मचारी,पुरोहितवर्ग,हाॅटेल व्यावसायिक, भक्तनिवास व त्यावर आधारित छोट्या छोट्या सेवा देणारे व्यावसायिक अशा शेकडो कुटुंबाची कुचंबणा होत आहे.मंदिरावर मोठं अर्थचक्र अवलंबून आहे मात्र "परळीत देउळबंद" आवस्थेने रोजीरोटीच्या अनेक समस्या उभ्या केल्या आहेत.

             ---------- video-----------+-



🕳️परळीचा वैद्यनाथ हा वैद्यांचा नाथ आहे.अनेकांच्या व्याधी त्याच्याच कृपेने नाहिशा होतात.या महामारीच्या काळात मनस्वास्थ्य हरवलेल्या परिस्थितीत मानसिक समाधान जर वैद्यनाथ दर्शन घेऊन होते अशी आमची श्रद्धा आहे.त.यामुळे मंदिर सुरू करावे.

     -गोपाळ आंधळे, भाविक

🕳️ मंदिर बंद असल्यानं अनेकांची जगण्याची दारे देखील बंद झालीत. मंदिर परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिक, गाडी लावून छोटे व्यावसाय करणारे व्यावसायिक यांचा उदरनिर्वाह बंद आहे. मंदिरं सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे.
-अमर मोगरकर ,व्यावसायिक.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार