MB NEWS- *उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन:तीन अटक आरोपींपैकी एक आरोपी मुळ परळी तालुक्यातील सिरसाळ्याचा ; बीड जिल्ह्यात खळबळ*

 *उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन:तीन अटक आरोपींपैकी एक आरोपी मुळ परळी तालुक्यातील सिरसाळ्याचा ; बीड जिल्ह्यात खळबळ*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन उघड झाले आहे. उत्तर प्रदेश धर्मांतर प्रकरणात एटीएसने केलेल्या कारवाईत तीन अटक आरोपींपैकी एक आरोपी मुळ परळी तालुक्यातील सिरसाळ्याचा आहे.देशभरात गाजत असलेल्या या प्रकरणी सिरसाळा येथील युवक गुंतल्याचे उघड झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

           उत्तर प्रदेशमधील तब्बल 3 हजार मूकबधीर विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणाचा तपास तिथल्या दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोघांना अटक केली होती. आता या प्रकरणाचे बीड कनेक्शनही उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मूळच्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा इथला रहिवासी असलेल्या इरफान खान नावाच्या युवकाला अटक केली आहे.

  🌑 *कोण आहे हा सिरसाळयाचा इरफान खान......*

         इरफान खान नावाच्या तरुणाला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले आहे. इरफान मूळ बीडमधील परळी तालुक्यातील सिरसाळा रहिवासी आहे.इरफानचे प्राथमिक शिक्षण सिरसाळा या त्याच्या मूळ गावी झालेले आहे. इरफान गेल्या आठ वर्षांपासून दिल्लीत स्थायिक झालेलाआहे. तिथे तो बालकल्याण विभागामध्ये म्हणून काम करतो असे सांगितले जाते. तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी तो काम करत असायचा असेही त्याच्या परिचयातील लोक सांगतात. इरफान चे वडील खाॅजाखाॅ यांना सिरसाळा परिसरात सर्व जण ओळखतात.काही दिवसांपूर्वी खाॅजाखाॅ यांचे निधन झाले.इरफान च्या कुटुंबात आई,दोन भाऊ असा परिवार असुन त्याची सासुरवाडी परळीचीच आहे. परंतु अनेक वर्षांपासून तो फारसा गावी येत नसल्याचे सांगण्यात येते.दरम्यान सध्या त्याच्या राहत्या घराला कुलूप असुन कुटुंबिय बाहेरगावी गेल्याचे समोर आले आहे.मात्र या प्रकरणात जाहीर प्रतिक्रिया देण्यास त्याच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे.

🌑 *स्थानिक पोलीसात याप्रकरणी घडामोड नाही....*

         दरम्यान विविध वृत्तवाहिन्यांवर व बातम्यांमधुन याप्रकरणी माहिती प्रसारित होत आहे.सिरसाळा येथे चौकशीसाठी कोणतेही पथक येऊन गेलेले नाही.तसेच याबाबत अन्य माहितीबद्दल उत्तर प्रदेश एटिएस किंवा पोलीस कोणाकडून काहीही विचारणा अद्याप नाही. केवळ या प्रकरणात एटीएसने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी इरफान खान मुळ रहिवासी येथील आहे एवढाच याचा संदर्भ आहे.

           - प्रदीप एकशिंगे, स.पोलीस उपनिरीक्षक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार