MB NEWS- सेवानिवृत्तीबद्दल विशेष लेख:आमचे कार्यालयीन अधीक्षक प्रमोद पत्की सर म्हणजे उत्तम प्रशासक व मनाचा मोठेपणा जपणारा माणुस

 आमचे कार्यालयीन अधीक्षक प्रमोद पत्की सर म्हणजे उत्तम प्रशासक व मनाचा मोठेपणा जपणारा माणुस



          काही जणांच्या जीवनात सेवानिवृत्ती हा एक असा प्रसंग असतो कि जिथे बोलण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात कारण अशा वेळी मनात सगळ्या प्रकारच्या भावना आपण व्यक्त करण्यासाठी उतावळे असतो.  त्या वेळी, आपण आनंदी क्षण आणि काही दु: खी क्षण अश्या दोन्ही क्षणांचा काही विचार त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतात.  सेवानिवृत्तीचे क्षण हे आयुष्यभरातील अनुभवाची शिदोरी असते.आमचे कार्यालयीन अधीक्षक प्रमोद पत्की सर हे दि.३० रोजी सेवानिवृत्त होत आहेत.प्रमोद पत्की सर म्हणजे उत्तम प्रशासक व मनाचा मोठेपणा जपणारा माणुस असं वर्णन सार्थ ठरेल.

          कार्यालयीन अधीक्षक प्रमोद पत्की सर हे कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १९९७ मध्ये रुजु झाले.आजपर्यंत आपल्या कार्यकाळात  प्रत्येकाचे काम आत्मियतेने केले.अधिकारी पदावर बर्‍याच जणांबरोबर आयुष्यात अनेक वर्षे कामात घालवली.  कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. आयुष्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मला त्याची खूप मदत झाली आणि पुढे सुद्धा होईलच.  व्यवस्थापन क्षमता, वेळ, प्रामाणिकपणा आणि कार्यसंघ यासारख्या विविध महत्वाची कौशल्ये या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. आपले ध्येय गाठायचे व संस्थेची प्रगती साधली जाते की नाही यासाठी समर्पण आणि प्रेरणा यामुळे  कार्यसंघ म्हणून एकत्र काम करून घेउन यश मिळवले. आपल्या सर्व  कर्मचार्‍यांशी सदैव प्रेमाचे व प्रसंगी कठोर होत त्यांनी काम करुन घेतले.  तुम्ही दुसर्यांना जेव्हा सन्मान देतो तेव्हा आपल्याला सुद्धा सन्मान मिळतो तो अप्रतिम असा असतो. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रमोद पत्की सर आहेत.

         प्रमोद पत्की सर यांच्या कडुन  बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्या कामावर केंद्रित रहा आणि सतत प्रयत्न करा. आपण आपल्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये निश्चितच यशस्वी व्हाल. हे त्यांच्या कडे पाहून शिकता येते. एम.काॅम. शिक्षण झालेले पत्की सर कार्यालयीन अधीक्षक म्हणून एक उत्तम प्रशासक आहेत.त्यांची कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने शैली आदर्श आहे. आज ते सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.मात्र त्यांनी दिलेली शिस्त, शिकवण व प्रेम आमच्यासारख्या कर्मचारी वर्गाला सतत मार्गदर्शन व प्रेरणा देईल हे निश्चित. पत्की सरांना सेवानिवृत्ती च्या हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी, दीर्घायुष्यासाठी प्रभु वैद्यनाथाचरणी विनम्र प्रार्थना.

    *-  राजेश देशमुख,* कै.ल.दे.महिला महाविद्यालय, परळी वैजनाथ.

टिप्पण्या

  1. he is the best son, brother, father, emploer, friend. THE BEST WISHES FOR HIS SECOND INNG OF LIFE .CONGRATES.

    उत्तर द्याहटवा
  2. हार्दिक शुभेच्छा प्रमोदराव....

    धनंजय गुडसूरकर
    सदस्य
    महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई
    ९४२०२१६३९८

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?