MB NEWS- *खाटिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात शासन लवकरात लवकर कार्यवाही करेल : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे*

 *खाटिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात शासन लवकरात लवकर कार्यवाही करेल : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे* 



मुंबई,दि.30: खाटिक समाजाच्या मागण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेवून या समाज बांधवाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिली.


            मंत्रालयातील दालनात आखिल भारतीय खाटिक समाजाच्या विविध मागण्यांबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे, सहसचिव दिनेश डिंगळे यासह वरिष्ठ अधिकारी तसेच आखिल भारतीय खाटीक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप,सरचिटणीस सुजित धनगर यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.



            श्री.मुंडे म्हणाले, खाटिक समाजाच्या विविध मागण्या या धोरणात्मक निर्णयांच्या आहेत. त्यासाठी पुर्ण अभ्यासांती या विविध मागण्या व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून तातडीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.या समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती,जात पडताळणी करताना येणा-या अडचणी,विविध योजना तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसदर्भात कार्यवाही करण्यात येईल.


      अनुसूचित जातीतील खाटिक समाज बांधवाना चर्मकार समाजातील गटई कामगारांप्रमाणेच स्टॉल मिळावा, या समाजाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा,हिन्दु खाटिक मागासवर्गीय महामंडळ सुरू करावे,आखिल भारतीय खाटिक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै.रघुनाथराव (नाना) जाधव यांची जयंती शासनस्तरावर साजरी करावी,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेळी मेंढी आठवडा बाजार सुरू करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन आखिल भारतीय खाटिक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप व सरचिटणीस सुजित धनगर यांच्यासह सदस्यांनी मंत्री महोदयांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !