MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना तर विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला 🌑 कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना चोरटेमुक्तीकडेही लक्ष देण्याची गरज 🌑

 परळीत चोरट्यांना अनलाॅक:  बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना तर विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकली ही चोरीला 



🌑 कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना चोरटेमुक्तीकडेही लक्ष देण्याची गरज 🌑

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       परळीत गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.बाजारात मोबाईल चोरीच्या अनेक घटना आज दि.१४ रोजी घडल्या आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे.यात काही तक्रारी ही पोलीसांकडे आलेल्या आहेत.

    

      अनलाॅकनंतर बाजारात गर्दी जमली आहे. परळीत पोलीस प्रशासन गुन्हेगारी पुढे हतबल आहे. शहरातील दोन ठाणे व त्यांच्या हद्दी या तांत्रिक घोळात सगळ्या घटना घुटमळत असतात.कालच्या गाड्या फोडाफोडी च्या घटना ताज्या असतानाच आजआठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.आज दि.१४ रोजी दुपारी १२ वा.पर्यंत पाच नागरिक तक्रार घेऊन पोलीसांपर्यंत आले आहेत.पोलीसांपर्यंत न आलेले अनेक जण आहेत.

       बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल,पर्स चोरीच्या घटना  वाढलेल्या बघायला मिळत आहेत.या अनुषंगाने पोलीस बाजाराच्या दिवशी प्राधान्याने लक्ष ठेवून आहेत.मात्र चोरटे सुसाट आहेत.बाजारात पोलीस असताना ही जवळपास पाच जणांच्या मोबाईलवर डल्ला अज्ञात चोरट्यांनी मारला आहे.याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहे.आज आठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 🕳️ मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना......

          दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे.यात काही तक्रारी ही पोलीसांकडे आलेल्या आहेत. शहर पोलिस ठाणे, संभाजी नगर पोलीस ठाणे, सिरसाळा पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये नितीन अर्जुनराव बांगर रा.नाथनगर परळी यांची मोटारसायकल अज्ञात चोरांनी हॅण्डललाॅक तोडून चोरली आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर भागातील रहिवासी परमेश्वर बाबु सानप यांची पॅशन प्रो मोटारसायकल चोरीला गेली आहे.सिरसाळा पोलीस ठाण्यात ही भागवत शिवाजी कदम यांनी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली आहे. विविध ठिकाणी अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांना धडकी भरत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार