MB NEWS-परळीत न.प. कारभाराविरुद्ध भाजयुमोची निदर्शने; पाणी साचलेल्या खड्ड्यांची केली पुजा


परळीत न.प. कारभाराविरुद्ध भाजयुमोची निदर्शने; पाणी साचलेल्या खड्ड्यांची केली पुजा



परळी l प्रतिनिधी

परळी नगर पालिकेचा कारभार अत्यंत ढिसाळ झाला असून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. नागरी समस्यांकडे पालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मान्सूनपूर्व कुठलीही कामे करण्यात आली नसल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे आणि त्या खड्यात पावसाच्या पाण्याने चिखल झाला आहे. शहरातील सर्व छोट्या आणि मोठ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या बाबीचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी शहराच्या रस्त्यांवरील खड्यांची पूजा करून नगर पालिकेच्या ढिसाळ कारभाराची आरती करण्यात आली. 

परळी शहरातील गणेशपार रोड, स्टेशन रोड, टॉवर रोड, बाजार समिती परिसर, नाथ रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागांत मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून त्यात पावसाचे पाणी साठल्याने चिखल झाला आहे. सर्वत्र राडाच राडा झाला असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि मुलांच्या अंगावर चिखल उडत आहे. नगरपालिका प्रशासनाला नागरी समस्यांचे काही घेणेदेणे नाही असे दिसत असल्याचा आरोप भाजयुमोच्या वतीने करण्यात आला असून, सोमवारी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पूजा करून भ्रष्ट नगर पालिका प्रशासनाची आरती करण्यात आली. यावेळी धिक्कार आणि निषेधाच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या. सोमवारी झालेल्या तीव्र आंदोलन प्रसंगी मोहन जोशी,सचिन गित्ते,नरेश पिंपळे,ॲड.अरुण पाठक, योगेश पांडकर,अश्विन मोगरकर,सुशील हरंगुळे,गोविंद चौरे,वैजनाथ रेकने,बंडू नाना कोरे,गणेश होळंबे,श्रीपाद शिंदे,निलेश जाधव,शाम गित्ते,दत्ता लोखंडे ,ऐराज खान व इतर भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार