परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
🌑 *परळी येथे प .पू. वामनानंद महाराजांच्या पुण्यतिथीचे दि.३ जुलै रोजी आयोजन*🌑
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड चे मठाधिपती ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे परळीत ३ जुलै रोजी कोविडविषयक नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ वद्य नवमी दि . ०३ I ०७I २०२१ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या *पुण्यतिथी* उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभ सकाळी ९ वा . श्री गुरु वामनानंद महाराजांच्या प्रतिमा पूजनविधी, ११ . ०० वा .श्रीगुरू पंचपदी प होईल . दुपारी १२वा .आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर मंदिर , देशपांडे गल्ली, गणेश पार परळी वैजनाथ येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त शिष्यवृंद,भक्तपरिवार, परळी वैजनाथ यांनी केले आहे. सर्वांनी कोविडविषयक नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा.गर्दी करु नये.सोशल डिस्टंसिंगच्या नियमात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा