युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-यंदा शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन पेरावं लागणार : परळीसाठी महाबीजकडून केवळ ४५० बॅगा !

 यंदा शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन  पेरावं लागणार : परळीसाठी महाबीजकडून  केवळ ४५० बॅगा !



परळी  वैजनाथ, प्रतिनिधी....

      परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी घरचेच सोयाबीन  पेरावं लागणार अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण महाबीजने लाॅटरी पद्धतीने केवळ ४५० बॅगा च परळीला उपलब्ध झाल्या आहेत.राज्यात  महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परळीतही तीच अवस्था निर्माण झाली आहे.शेतकर्यांना अधिकाधिक बियाणे उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.

      

    महाराष्ट्रात मान्सून पाऊस वेळेअगोदर दाखल झाला आहे. राज्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. मात्र, राज्यात काही ठिकाणी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. सतत दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मध्ये समाधान कारक पावसाने हजेरी लावली आहे.कापसाप्रमाणं सोयाबीनचं पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. मात्र, महाबीजकडे सोयाबीनच्या बियाणांची कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

     सोयाबीन बियाणे साठी 25 मे पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार होती. यानंतर लॉटरी पद्धतीने सोयाबीनचं बियाणं वाटप करण्यात आले. परळीत मात्र महाबीजच्या केवळ 450 बॅग उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच बियाणं वापरावं, असं आवाहन कृषी विभागाचे कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या