MB NEWS- प्रा.शामसुंदर दासुद लिखित विशेष लेख : ना.धनंजय मुंडे यांचा लोकहितकारी " सेवा धर्म".....

   ना.धनंजय मुंडे यांचा लोकहितकारी " सेवा धर्म".....


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

✍️लेखक✍️


--------

प्रा.शामसुंदर दासुद

परळी वैजनाथ.

--------


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदतीची खरी गरज असते. परंतु संपूर्ण समाज जेव्हा संकटात असतो तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाच्या मदतीसाठी पुढे येणारी माणसं ही खऱ्या अर्थाने "हिरो"असतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भीषण स्वरूप आपण सर्वांनी अनुभवले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राबरोबरच बीड जिल्हाही होरपळून निघाला होता. बीड जिल्ह्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या संकटावर मात करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करत असतांनाच आपल्या कर्मभूमी आणि मातृभूमीतील लोकांना धीर देण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी परळीचे भूमिपुत्र आणि आपले सर्वांचे कर्तृत्ववान नेतृत्व, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना. धनंजय मुंडे साहेबांनी "सेवाधर्म" सारे काही समष्टीसाठी या संकल्पनेतून परळी शहर आणि तालुक्यातील आपल्या लोकांसाठी हा यज्ञ उभा केला. या सेवा यज्ञात आदरणीय वाल्मीक अण्णा कराड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी आणि शहर सचिव तथा नाथ प्रतिष्ठानचे सचिव अनंत इंगळे यांच्या टीमने अतिशय उत्तमरित्या काम करत सामूहिकरीत्या मदत करण्याचा एक नवीन आदर्श परळी तालुक्यात समोर ठेवला आहे. ना. मुंडे साहेबांच्या संकल्पनेतील या सेवा यज्ञात एक साथ तीन ते चार आघाड्यांवर मदतीचे कार्य हाती घेण्यात आले होते.

    1) कोरोना योद्ध्यांची मदत करणे आणि त्यांचे प्रोत्साहन वाढविणे----

   कोरोना काळातील अतिशय भीतीच्या वातावरणात प्रत्यक्ष फिल्डवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सेवा धर्माच्या टीमने फिल्डवर काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना 1500 सुरक्षा किट वितरित करण्यात आल्या. या किटमध्ये ऑक्सीमिटर, जलनेती पात्र, सॅनिटायझर इत्यादी सुरक्षाविषयक वस्तूंचा समावेश आहे. याबरोबरच शहरातील विविध दवाखान्या मध्ये काम करणाऱ्या'क' आणि 'ड'दर्जाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना टिफिन बॉक्स चे वितरण करण्यात आले आहे.

 कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची विमा पॉलिसी उतरविण्याचे काम हे सेवा धर्माकडून करण्यात आले आहे.

2) कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची आणि मोफत उपचाराची व्यवस्था---

    परळी शहरात बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला विलगीकरण केंद्राची निर्मिती सेवा धर्माच्या टीमकडून करण्यात आली होती. यामध्ये महिला आणि लहान मुलांसाठी 100 खाटांचे सुसज्य विलगीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या विलगीकरण केंद्रात शहर आणि तालुक्यातील महिला रुग्णांसाठी मोफत उपचार याबरोबरच राहण्या-खाण्याचीही मोफत व्यवस्था करण्यात आलेली होती. एवढेच नाही तर मनोरंजनासाठी टीव्ही आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही उभी करण्यात आली होती. या केंद्रात डॉ. देशपांडे आणि डॉ. टिंबे या तज्ञ डॉक्टरां बरोबरच कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा बहाल करण्यात आली होती.  

 'टेलीमेडिसिन सेवा' या योजनेअंतर्गत कोरनाविषयी काही शंका असल्यास किंवा उपचार विषयक काही माहिती हवी असल्यास फोनद्वारे कोरैना विषयी औषधांची आणि घ्यावयाच्या काळजीची माहिती तज्ञ डॉक्टरांकडून दिली जात होती. 

3) गरीब कुटुंबांना विवाह निधी--

     नाथ प्रतिष्ठान आणि सेवाधर्म यांच्या टीमने सर्वांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचे अभिमानास्पद मदत कार्य केले आहे. तालुक्यातील 150 गरीब कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये मुलीच्या विवाहासाठी मदत म्हणून वितरीत करण्यात आले आहे. ज्या गरीब कुटुंबातील मुलीचा विवाह या कोरोना काळात करण्यात आला त्यांना मदत म्हणून साहेबांच्या वतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

 एवढेच नाही तर म्यूक्रोमायक्रो- सिस या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना ही आदरणीय वाल्मीक आण्णांच्या हस्ते प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी रोख मदत करण्यात आली.

 4) कोरोना विषयी जागरूकता निर्माण करत विविध प्रकारचे मदत कार्य---

    सेवा धर्माच्या टीमकडून कोरोना काळात अनेक प्रकारची मदत कार्य हाती घेण्यात आली होती. स्व. पंडित अण्णा भोजन ग्रह आणि सेवाधर्म यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी यंत्राद्वारे फवारणी करण्यात आली. शहरातील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून जागृती मोहीम राबविण्यात आली. यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लसीकरण नोंदणी कक्षाची स्थापना करून नागरिकांची मदत करत होते. याबरोबरच लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना सेवा धर्माच्या टीमकडून मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती.

  शहरातील जे लोक कोरोना संसर्गाने बाधित झाले आहेत अशा लोकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून सेवा धर्मातील टीमच्या कार्यकर्त्यांनी प्रोटीन बँक या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना मोफत अंडी व मटकीचे वितरण केले आहे.

    साहेबांच्या संकल्पनेतील सेवा धर्माची जबाबदारी स्वीकारून कोरोना काळात समाजाची सेवा केलेल्या सेवा धर्म टीमचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु मंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी असताना, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्याची जबाबदारी असताना आपल्या कर्मभूमिची विशेष काळजी असणारे आणि एवढ्या सगळ्या कामाच्या ताणातूनही आपल्या लोकांसाठी सेवा धर्माच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करणारे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व ना. धनंजय मुंडे साहेब हे विशेष कौतुकास पात्र आहेत. साहेबांनी उभा केलेल्या या सेवा कार्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन  

✍️लेखक✍️

प्रा.शामसुंदर दासुद

 परळी वैजनाथ.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !