MB NEWS-नवगण महाविद्यालयात विद्यार्थी सेना कार्यकारीणीची घोषणा

 नवगण महाविद्यालयात विद्यार्थी सेना कार्यकारीणीची घोषणा



जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत नुतन कार्यकारीणीने बांधले शिवबंधन

परळी । प्रतिनिधी

शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेची नवगण महाविद्यालय, परळी वैजनाथची कार्यकारीणी नुकतीच घोषीत करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख प्रा.अदुल दुबे यांच्या हस्ते नुतन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या प्रमुख समस्या अणि त्यांच्या न्याय हक्कावर आवाज उठविण्यासाठी कार्यकारीणीला खंबीर बळ देऊ असे आश्वासन यावेळी प्रा.अतुल दुबे यांनी दिले.

शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेच्या नवगण महाविद्यालय शाखा प्रमुख पदी नवल वर्मा तर सचिवपदी विनित वानरे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीवर सदस्य म्हणून गणेश सोनी, राघव पटेल, अभिनंदन धर्माधिकारी, वैजनाथ सानप, मोहीत जोशी, रोहन वांगीकर, मोहीत अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे, परळी शहर प्रमुख गजानन कोकीळ यांनी नुतन कार्यकारीणीचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार