MB NEWS-प्रभाग 13 मध्ये कोविड लसीकरनात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद,500 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतली लस..!* *श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत जनसेवा करणार..!प्रा पवन मुंडे*

 *प्रभाग 13 मध्ये कोविड लसीकरनात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद,500 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतली लस..!*



*श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत जनसेवा करणार -प्रा पवन मुंडे*


परळी प्रतिनिधी : आज दिनांक 3 जुलै रोजी परळी आरोग्यविभाग व भाजपाच्या वतीने मा ना पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 13 मधील प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या संकल्पनेतून पवनसुत हनुमान मंदिरसह दोन ठिकानी कोविड लसीकरण करण्यात आले,या प्रसंगी या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, या वेळी 500 पेक्षा जास्त नागरिकांनी या वेळी कोविड लसीकरण करून घेतले.



      या वेळी झालेल्या लसीकरण उदघाटन कार्यक्रम प्रसंगी नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादा बद्दल नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी आपल्या मनोगतात जनतेचे आभार तर माणलेच पण लोकांचे प्रेम व प्रतिसाद पाहून प्रा मुंडे च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले या प्रसंगी आपल्या मनोगतात श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत आपण जनसेवेचा वारसा सोडणार नाही असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश देशमुख, जेष्ठ नेते दत्तापा इटके गुरुजी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे ,शांतीलाल जैन,राजाभाऊ दहिवाळ,प्रा डॉ अरुण अर्धापुरे,योग शिक्षक बालासाहेब कराड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन अनंत मुंडे सर यांनी तर आभार बंडू आघाव सर यांनी मांडले.



लसीकरण कार्यक्रमास भाजपाचे किशोर केंद्रे,मोहन जोशी, ऍड अरुण पाठक,योगेश पांडकर,विनायक शंकूरवार, महादेव इटके, नरेश पिंपळे, विकास हालगे,विजयकुमार खोसे,वैजनाथ रेकने,सुशील हरंगुळे,कमलाकर हरेगावकर,अनिष अग्रवाल,दिलीप नेहरकर,बालाजी पुरबुज,सम्राट गित्ते,सोन्या मुंडे,आशिष कद्रे,विजय दहिवाळ, वैजनाथ चाटे,गणेश स्वामी,महेश मुंडे,रमेश मुंडे,मामा दहिफळे,अजिंक्य मोरे,बबलू केंद्रे, आदिनाथ खाडे आदी कार्यकर्ते व प्रभागातील अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार