MB NEWS-लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळास 20 कोटी रुपयांची तरतूद; पावसाळी अधिवेशनात घोषणा* *ही तर सुरुवात आहे; राज्य सरकारचे आभार - ना. धनंजय मुंडे*

 *लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळास 20 कोटी रुपयांची तरतूद; पावसाळी अधिवेशनात घोषणा*



*ही तर सुरुवात आहे; राज्य सरकारचे आभार - ना. धनंजय मुंडे*


मुंबई (दि. 05) ---- : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच 20 कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान करण्यात आली आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती.


लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वाटचालीची ही सुरुवात आहे; आणखी खूप कामे करणे बाकी आहे. राज्य सरकारने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कधीही निधीची कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. आज प्रथमच महामंडळाला 20 कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार प्रकट केले आहेत. 


अनेक वर्षे केवळ कागदावर व घोषणेपूरते मर्यादित राहिलेल्या ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याकडे वर्ग करून घेतल्यानंतर या महामंडळास खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. 


ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यादृष्टीने नुकतीच धनंजय मुंडे यांनी संत भागवनबाबा शासकीय वसतिगृह योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत 10 जिल्ह्यातील 41 तालुक्यात 82 वसतिगृहे उभारण्यास व यांपैकी 20 वसतिगृहे याच शैक्षणिक वर्षात उभारण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आहे. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे आता जुलै 2021 या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात पुरवणी मागण्यांच्या यादीत या महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून 10 कोटी रुपये आणि सहाय्यक अनुदान म्हणून 10 कोटी असे एकूण 20 कोटी रुपये महामंडळ भागभांडवल म्हणून तरतूद करण्यात आली आहे. 

ऊसतोड कामगारांसाठी अनेक नेते पुढे आले, अनेक वर्ष विविध घोषणा झाल्या मात्र त्यांच्या कल्याणासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र सत्तेत आल्यानंतर दीड वर्षांच्या आत ऊसतोड कामगारांच्या बाबत ठोस निर्णय घेऊन महामंडळास मूर्त स्वरूप प्रदान केले आहे. आज या महामंडळास आर्थिक तरतूद प्राप्त झाल्याने या महामंडळाचे भविष्य आशावादी ठरणार आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !