MB NEWS-आरोग्यसेवा सप्ताह :परळी उपजिल्हारुग्णालयात 20 महिलांवर बिनाटाका कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया*

 *आरोग्यसेवा सप्ताह :परळी उपजिल्हारुग्णालयात 20 महिलांवर बिनाटाका कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.१५ रोजी "आरोग्यसेवासप्ताह" मध्ये उपजिल्हारुग्णालय परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सहकार्यातून 20 महिलांवर बिनाटाका दुर्बीणद्वारे  शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सहकार्यातून 20 महिलांवर बिनाटाका दुर्बीणद्वारे  शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी या शस्त्रक्रिया केल्या. यावेळी डॉ.साबळे यांच्यासह वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे,मगरे मॅडम व सर्व आरोग्यदूत यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे महिला आघाडीच्या नेत्या सौ.रेखाताई फड,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चनाताई रोडे,युवती आघाडीच्या शहराध्यक्षा पल्लवीताई भोयटे,तालुकाध्यक्षा सुलभाताई साळवे,अन्नपूर्णाताई जाधव,चित्राताई देशपांडे, धुमाळ ताई,पोखरकर ताई,तिडके ताई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार