MB NEWS-परळीत आजपासून विकासाचे नवे पर्व* *वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ* *33 केव्ही सबस्टेशन तसेच शहरातील प्रमुख दोन रस्त्याच्या कामांचेही होणार भूमिपूजन*

 *परळीत आजपासून विकासाचे नवे पर्व*



*वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ*


*33 केव्ही सबस्टेशन तसेच शहरातील प्रमुख दोन रस्त्याच्या कामांचेही होणार भूमिपूजन*


परळी (दि. 21) ---- : मुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात विकासपर्व सुरू असून, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री (भक्त) निवासच्या भव्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ना. मुंडेंच्या हस्ते उद्या  गुरुवारी दि. 22 रोजी करण्यात येत आहे. त्याच बरोबर व्ही.आय.पी. सर्किट हाऊस परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन 33 केव्ही सबस्टेशनच्या उभारणी कामाचे व परळी शहरातील दोन महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याच्या कामांचे देखील यावेळी ना. मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात जुन्या तहसीलच्या जागी भव्य यात्री निवास उभारण्यात येणार आहे. सायंकाळी 5.45 वा. होणाऱ्या या भूमिपूजन समारंभास ना. मुंडे यांच्या सह आ. संजय दौंड, नगराध्यक्षा सौ. सरोजिनिताई हलगे, वैद्यनाथ मंदिर समितीचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह सर्व विश्वस्त, पदाधिकारी तसेच नगर परिषदेचे सर्व सभापती, पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


*नवीन 33 kv चे भूमिपूजन*


त्याचबरोबर सर्किट हाऊस परिसरात 33 केव्ही सबस्टेशन उभारल्यामुळे मुख्य विद्युत वाहिनीवरील ताण कमी होऊन विजेचा लपंडाव बंद होण्यास मोठी मदत मिळणार आहे. या कामाचे सर्किट हाऊस परिसरात सायंकाळी 5.15 वा. भूमिपूजन करण्यात येणार असून, या समारंभास ना. मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी तसेच महावितरणचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


*2 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ*


परळी शहरातील संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय व दोस्ती टी हाऊस ते अग्रवाल आईस फॅक्टरी या दोन महत्वाच्या रस्त्याच्या कामांचेही ना. मुंडेंच्या हस्ते उद्या सायंकाळी 5.15 वा. भूमीपूजन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, आ. संजय दौड,  यांच्या सह नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, गटनेते वाल्मिकअण्णा कराड , सर्व सभापती, पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमास नागरिकांनी  करोना नियमांचे पालन करत उपस्थित रहावे असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने तसेच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

  1. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे दोस्ती टी हाऊस अग्रवाल आईस फॅक्टरी रोडचे काम होत आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !