इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र 'सफाई कर्मचारी आयोग कक्ष' स्थापन* *धनंजय मुंडेंनी 5 दिवसातच दिलेला शब्द केला पूर्ण* *स्वतंत्र कक्ष व अधिकारी-कर्मचारी नियुक्त*

 *सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र 'सफाई कर्मचारी आयोग कक्ष' स्थापन*



*धनंजय मुंडेंनी 5 दिवसातच दिलेला शब्द केला पूर्ण*



*स्वतंत्र कक्ष व अधिकारी-कर्मचारी नियुक्त*


मुंबई (दि. 05) ---- : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत 'सफाई कर्मचारी आयोग कक्ष हे स्वतंत्र कार्यासन निर्माण करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

दि. 01 जुलै रोजी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा शब्द सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 5 दिवसातच पूर्ण केला आहे. 


या शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगासंबंधीची सर्व कामे व सफाई कर्मचार्यांशी संबंधित अन्य सर्व बाबी या नवीन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असुन, या कार्यासनास कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपीक, टंकलेखक आदी पदांसाठी अधिकारी - कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


सामाजिक न्याय विभागांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय दि. 01 जुलै रोजी झालेल्या बैठकीत ना. धनंजय मुंडे यांनी घेतला होता. 


हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतली 21 प्रकरणे प्रलंबित आहेत, ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली निघावीत, सफाई कर्मचाऱ्यांचा घराचा अनुशेष भरून काढणे, वारसा हक्क कायदा, ठेकेदारी पद्धत बंद करणे यांसारखे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्ष पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.

टिप्पण्या

  1. B.A,b.com sweeperancha padnoticha vichar krava /5 divsancha aatvda ha sweeperana lagu nahi sutticha divshi mhnjech satrday divshi kamacha mobdla milava

    उत्तर द्याहटवा
  2. हो सफाई कर्मचारी यांना सुद्धा 5दिवसाचा आठवडा करावा तसेच सुट्टीच्या दिवशी काम केल्यास आर्थिक मोबदला मिळावा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!