MB NEWS-मोफत बीपी व शुगर तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद* *सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये 5 वे शिबीर संपन्न*

 *मोफत बीपी व शुगर तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद*



*सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये  5 वे शिबीर संपन्न*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       ना.धनंजय मुंडे आरोग्यमित्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध भागात मोफत बीपी व शुगर तपासणीचे 100 शिबीरे घेण्यात येत आहेत.अंबेवेस येथे डॉ.आनंद टिंबे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये  5 वे शिबीर घेण्यात आले. यावेळी असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला. 

       या शिबीराची नागरिकांना मोठी उपलब्धता  होत आहे.  असंख्य नागरिक बंधु भगिनींचे प्राथमिक निदान होवू शकत आहे.  त्यांना प्राथमिक मोफत औषधी तात्काळ दिली जात आहे. असंख्य नागरिकांना ज्यांना रक्तदाब व मधुमेह असूनही ते अवगत नव्हते व उपचार चालू नव्हते व आज त्यांचे प्रत्यक्ष उपचार सुरु झाले आहेत. आजचे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.संतोष मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक अनिल आष्टेकर,डॉ.आनंद टिंबे,डॉ. सुवर्णा टिंबे,माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले,रमेश चौण्डे,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे,किरण सावजी,राहुल ताटे, चंद्रप्रकाश हालगे,अतुल ताटे, शैलेंद्र आर्वीकर,अभय लोणीकर,डॉ. माया समशेट्टी,यांच्यासह ना.धनंजय मुंडे आरोग्यमित्र व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले  व आरोग्यसेवक यांनी आरोग्यसेवा दिली.

 🕳️  *उद्या गुरुवारी पेठगल्लीत शिबीर...*

       उद्या गुरुवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता श्री.बालाजी मंदिर पेठगल्ली येथे कॅम्प संपन्न होणार असून याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व ना.धनंजय मुंडे आरोग्यमित्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार