MB NEWS- *✍️HSC result 2021: बारावीचा निकाल वेळेत लागणार; बोर्डाची ग्वाही* ------------------------------------------

 *✍️HSC result 2021: बारावीचा निकाल वेळेत लागणार; बोर्डाची ग्वाही*

------------------------------------------ 



बारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाचा गोंधळ, मुंबईत दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस पाहता निकाल वेळेत लागणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असून, निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.


शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना २१ जुलैपर्यंत मंडळाच्या कम्प्युटर प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत दिली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसांचा अवधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर ही मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्गशिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस, तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मात्र संकेतस्थळाच्या अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकत नसल्याचे समोर आले. बुधवारी दिवसभर सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षक गुण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करू शकले नव्हते. त्यातच गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी व विशेषतः कोकण पट्ट्यात, मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शिक्षकांना आपापल्या शाळा-कॉलेजांत पोहोचणे शक्य झालेले नाही. पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !