MB NEWS-परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला! नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा (video)

 परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!



नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा

परळी वैजनाथ | . .........

    परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या  तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा झाला आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज  (दि.२३) दुपारी २ वा. सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.

         परळी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. प्रदीर्घ  प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. गेल्या आठवडय़ात धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले  त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी  मोठी मदत झाली . मुख्य जलस्त्रोत असलेल्या  तालुक्यातील   नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा सद्यस्थितीत आहे. परळी शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तसेच तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग ही या धरणावर आवलंबून आहे. 

                           

                        @@@@

                             वाण धरण :

                             ●स्थापित क्षमता       - १९.७१७दलघमी

                             ● मृतसाठा               -  ०.३९७  दलघमी

                             ●उपयुक्त जलसाठा    - १९.३२०दलघमी 

                             ● पाणीसाठा सरासरी  - १०० टक्के.

                             @@@@@



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार