इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-ना.धनंजय मुंडेंच्या भाषणात एक वाक्य अन् पब्लिक बोललं 'वन्समोर'............!(VIDEO)

 


ना.धनंजय मुंडेंच्या भाषणात एक वाक्य अन् पब्लिक बोललं 'वन्समोर'............!


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         ना.धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे 'फॅन्स' खुप मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांच्या भाषणातील त्यांची वाक्यफेक, एखादे विशिष्ट वाक्य, काव्यपंक्ती इतक्या लोकप्रिय होऊन जातात की त्यानंतर सोशल मिडिया असो की बॅनर्स जिथे तिथे तेच दिसायला लागते.तरुणाईला तर धनंजय मुंडे यांचे हे डायलाॅग प्रचंड भावतात.असाच अनुभव दि.२२ रोजी परळीत झालेल्या भाषणाचाही आला.आपल्या अमोघ वक्तृत्व शेलीतुन भाषणाचा ओघ सुरू होता यादरम्यान ना.धनंजय मुंडे यांनी एक हिंदी शेर आपल्या शैलीत सांगितला अन् समोरचं पब्लिक बोललं 'वन्समोर. 

      राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे  म्हणजे एक अजोड वक्ता. त्यांचे अमोघ वक्तृत्व नेहमीच ऐकायला मिळते.त्यांचे भाषण ऐकणे ही एक वेगळीच पर्वणी असते. त्यांची भाषणाची स्टाईल अनेकांना 'दिवाणा' बनवते.त्यांचे भाषण सुरू झाल्यापासुन श्रोते खिळून बसतात.लाखो समर्थकांना एकाचवेळी 'अपिल' होणारा संदेश व संकेत देणं ही शैली धनंजय मुंडे यांच्याकडे आहे.धनंजय मुंडे म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचा अनोखा संगम आहे हे वेळोवेळी दिसुन येते.त्यांच्या एकाएका वाक्याचा परिणाम समर्थकांवर होतो.तसच त्यांच्या राजकीय रणनितीचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीची व्याप्ती खुप मोठी आहे.हजारो प्रमुख कार्यकर्ते आणि लाखो समर्थकांना एकाचवेळी 'अपिल' होणारा संदेश व संकेत देणं ही शैली धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. याचा अनुभव त्यांच्या भाषणानंतर येतोच येतो.

       परळीच्या मोंढा मैदानावर झालेल्या भाषणात संदर्भ देताना ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत एक शेर सांगितला."नफरत करना है तो सिद्दत से करो थोडीसी भी भुल हो गयी तो महौब्बत हो जाएगी" असा विषयाला धरुन अतिशय चपखल बसणारा हा शेर आणि खास शैलीत सादर झाल्याने समोरच्या पब्लिक मधुन उत्स्फूर्तपणे 'वन्समोर' म्हणून उद्गार निघाले. हा काय शेरोशायरी चा कार्यक्रम आहे का असं म्हणून धनंजय मुंडे यांनी भाषण पुढे घेऊन जात मुळ मुद्दयाकडे श्रोत्यांचे लक्ष वळविले त्यानंतर भाषणाच्या ओघात पुन्हा एकदा शेर सांगत चाहत्यांचीही वन्समोरची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर सोशल मिडियातुन मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी हा शेर व व्हिडिओ शेअर केला असल्याचे बघायला मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!