MB NEWS-परळीमार्गे धावणारी नांदेड-पनवेल एक्स्प्रेस आजपासून सुरू; पुणे-मुंबई ला जाणार्या प्रवाशांची गैरसोय दुर* 🌑 *_दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळीच जारी केले पत्र_*

 *परळीमार्गे धावणारी नांदेड-पनवेल एक्स्प्रेस आजपासून सुरू; पुणे-मुंबई ला जाणार्या प्रवाशांची गैरसोय दुर*



 🌑  *_दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळीच जारी केले पत्र_* 


परळी वैजनाथ: प्रतिनिधी.....

        गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या मुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.परळी मार्गे धावणार्या अनेक गाड्या बंदच आहेत.येथील रेल्वेस्थानकातून धावणारी पनवेल-नांदेड, नांदेड-पनवेल रेल्वे बंद होती.  मुंबई-पुण्याला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. ही एक्स्प्रेस रेल्वे गाडी  सुरू करावी अशी जोरदार मागणी बीड,परभणी, नांदेड,लातुर, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशी संघटना व नागरीकांनी लावुन धरलेली होती. शेवटी (आज दि.१) रोजी रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला.सकाळीच याबाबत दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळीच  पत्र जारी केले आहे.

     नांदेड येथून पनवेलला जाणारी रेल्वे पुणे मार्गे आहे. यामुळे परळीहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची ही अडचण होत होती. तसेच अमरावती-पुणे साप्ताहिक रेल्वेही बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. रेल्वे प्रवाशांना ट्रॅव्हल बसशिवाय पर्याय उरला नाही. मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद असलेल्या १२ पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या रेल्वे सुरू झाल्या तर प्रवायी संख्या जास्त होईल. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल. या कारणामुळे पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

       परळीहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करणे आवश्यक आहे अशी जोरदार मागणी केली जात होती. नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड ही रेल्वे गाडी सुरू करून प्रवाशांची गैरसोय टाळावी या मागणीने जोर धरला होता.मुंबईला जाण्यासाठी स्वस्त पर्याय असणाऱ्या रेल्वे बंद आहेत. यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने नाईलाजाने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. हा प्रवासाचा खर्चिक पर्याय आहे. नांदेड-पनवेल हुजूरसाहेब रेल्वे चालू करून प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांनी दिली आहे.

🌑

  *परळी मार्गावरून रेल्वे गाड्यांची सध्य स्थिती .....*

    *परळी मार्गावरून जाणाऱ्या बंद एक्स्प्रेस रेल्वे गाड्या:*

 नांदेड-पनवेल(आजपासून ही गाडी सुरू होत आहे.),

 अमरावती-पुणे.बंद पॅसेंजर गाड्या: आदिलाबाद-परळी, अकोला-परळी,पंढरपूर-निझामाबाद,मिरज-परळी,पूर्णा-परळी,हैदराबाद-पूर्णा. 

*सध्या सुरू असलेल्या रेल्वे:* काकीनाडा-शिर्डी,सिकंदराबाद-शिर्डी,विजयवाडा -शिर्डी, औरंगाबाद-हैदराबाद,बंगळुरू-नांदेड,कोल्हापूर-नागपूर.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !