MB NEWS- *मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळात भूमिका मांडण्याबाबत ना.धनंजय मुंडे यांना थांबवून संभाजी ब्रिगेडचे निवेदन*

 *मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळात भूमिका मांडण्याबाबत ना.धनंजय मुंडे यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन*



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


संभाजी ब्रिगेड मराठा ओबीसी करणाचा लढा गेल्या तीस वर्षापासून लढत आहे. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड वतीने ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये मराठा समाजाचे ओबीसी करण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण,मा. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नौकरीस पात्र उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात,मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.

या सर्व मागण्यांसह मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलणे आवश्यक आहे.मा. सुप्रीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मराठा समाजातील नोकरीस पात्र 2185 नियुक्त्या रखडलेल्या आहेत. हा तरुणांचा प्रश्न आहे. आपण एक आमदार आहात या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण तरुणांचे प्रश्न सोडवताल ही अपेक्षा आहे. तरी वरील विषय आपण समजून घेऊन. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडावी. परळी मतदार संघाचे आपण लोकप्रतिनिधी आहात. नाही राज्य सरकार मधील एक महत्त्वाचे आपण मंत्री आहात मराठा समाज आपल्याकडून मोठी अपेक्षा घेऊन बसला आहे. आपण विधिमंडळ अधिवेशनात भूमिकामांडावी. जर या वेळी मराठा आरक्षणा संदर्भात विधिमंडळ अधिवेशनात आपण भूमिका मांडली नाही तर संभाजी ब्रिगेड उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव, शिवश्री पवन माने, शिवश्री नामदेव भालेराव, शिवश्री प्रवीण धोंडगे शिवश्री प्रदीप पिंपळे या सह आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार